आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. भटकर, \'प्लॅंचेट\' सिद्ध करून दाखवा, 21 लाख देऊ- \'अंनिस\'चे आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी 'प्लँचेट'चा वापर करणे गैर नाही असे वक्तव्य ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी केल्यानंतर 'अंधश्रद्धा निर्मूलन समिती'ने भटकरांना याद्वारे खुन्याचा तपास लावून दावण्याचे खुले व जाहीर आव्हान दिले आहे. तसेच तपासाचा शोध लावल्यास रोख 21 लाख रूपये देण्यात येतील असेही अंनिसने म्हटले आहे.
महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे भूमिका जाहीर करीत हे आव्हान दिले आहे. त्यात म्हटले आहे की, एखाद्या खूनाचा तपास करताना प्लॅंचेट करणे गैर नाही तर डॉ. दाभोलकरांच्या आत्म्याला बोलवून खुन्याचा तपास लावून दाखवावा व ते जगासमोर आणावे. तसेच हे जाहीर आव्हान ज्येष्ठ शास्त्रज्ञ असलेल्या भटकरांनी स्वीकारवे असेही पत्रकात म्हटले आहे. जर भटकर यांनी शास्त्रीयदृष्ट्या दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाचा शोध लावल्यास अंनिस 21 लाख रूपये देण्यास बांधील आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
गेल्या रविवारी पुण्यात एका पुस्तक प्रकाशन समारंभात डॉ. भटकर यांनी डॉ. दाभोलकर हत्या तपास प्रकरणात प्लॅंचेटचा वापर करण्याबाबत समर्थन केले होते. पोलिसांकडून तपासाचा भाग म्हणून 'प्लँचेट'चा वापर करण्यात काहीही गैर नाही. परदेशातील पोलिस अशा अतिंद्रिय शक्तींचा वापर करीत असल्याचे दिसून येते असे भटकर यांनी म्हटले होते. दरम्यान, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासातील 'प्लँचेट'चा वापर केल्याने भटकर यांच्याविरोधात आंदोलन पुकारण्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इशारा दिला आहे.