आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारांना चहा पाजणे चुकीचे- अण्णा हजारेंचा मोदींवर निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या 'चाय पे चर्चा' या संकल्पनेवर टीका केली आहे. अण्णांनी म्हटले आहे, लोकांना चहा पाजून मते मागणे किंवा दारूच्या बाटल्या पुरवून मते मिळवणे दोन्हीही चुकीचे आहे.
मोदी यांच्या चाय पे चर्चा या कल्पनेवर विरोधी पक्षांनी याआधीच टीकास्त्र सोडले आहे. आता अण्णांनीही यावर टीका केली आहे. काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी मोदी यांना संसद भवन परिसरात चहासाठी स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर मोदींनी या टीकेचा फायदा घेत देशभरातील चहावाल्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून चाय पे चर्चा ही संकल्पना भाजपच्या बुद्धीजीवींनी पुढे आणली होती. मोदींनी नुकतेच देशभरातील एक हजार चहावाल्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. त्यावेळी भाजपच्या वतीने सर्वत्र चहा उपलब्ध करून दिला होता. अण्णांनी हा मुद्दा पकडत लोकांना चहा पाजून व चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नये असे टीकास्त्र सोडले आहेत.
आशेचा किरण आहे ममता बॅनर्जी, वाचा पुढे...