आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूसंपादनाविरोधात देशव्यापी आंदोलन, अण्णा हजारेंची पुण्यात घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - भूसंपादन कायद्यातील तरतुदींना विरोध करण्यासाठी देशव्यापी विशाल आंदोलन उभारण्याची घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी रविवारी पुण्यात केली.
देशात आजही या कायद्याविरोधात चळवळी होत आहेत. पण त्या विखुरलेल्या स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांची परिणामकारकता दिसत नाही. पुढील अधिवेशनापूर्वी दिल्लीसह देशात सर्वत्र एकाच वेळी या कायद्याविरोधात विशाल आंदोलन उभारणार आहे, असे अण्णा पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
या कायद्यासंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी पुण्यात दहा राज्यांमधून ४७ कृषी संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. लवकरच दिल्लीत बैठक होणार आहे.