आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Comment On Arvind Kejariwal Resign News

अरविंद केजरीवालांनी राजीनामा देणे योग्य- अण्णा हजारे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ‘काँग्रेससोबत जाणे ठीक नाही, हे मी अरविंदला आधीच सांगितले होते. खिचडी सत्तेपेक्षा एकहाती सत्ता कधीही स्वतंत्र असते व त्यात ताकद असते. काँग्रेस लोकपाल व मोहल्ला सभेला आता विरोध करत असेल तर केजरीवाल यांनी राजीनामा देणेच योग्य आहे’, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारी पुण्यात व्यक्त केले.

‘सरहद’ संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तैलचित्राचे अनावरण अण्णांच्या हस्ते झाले. तेव्हा अण्णा म्हणाले, ‘केजरीवालांना मी दिल्लीत भेटलो. त्याने लोकपाल व मोहल्ला सभा कायद्याचा निर्णय घेतल्याचे सांगून मसुद्याचे प्रकाशन करावे, अशी विनंती मला केली. मात्र, काँग्रेसचा या कायद्यांना विरोध आहे. त्यामुळे विधेयक मंजुरीनंतरच प्रकाशनाबाबत विचार करेन.’

असे कायदे प्रथमच : स्वातंत्र्यानंतर देशात अशा प्रकारचे कायदे प्रथमच होत आहेत. लोकशाही खर्‍या अर्थाने राबवण्याचा कोणाही पक्षाचा विचार नाही. सर्वांनी सत्ता राखून ठेवली आहे. मोहल्ला सभेत 18 वर्षांवरील सदस्यांचा समावेश असून सभेच्या ठराविक परिसरात कोणती विकासकामे करावयाची याचा निर्णय ते सदस्य घेतील. त्यांना या कामासाठी सरकार पैसा देईल, अशी संकल्पना असल्याचेही अण्णा म्हणाले.