आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Critcis On BJP MP Dilip Gandhi\'s Remarks On Tobacco Consumption

दिलीप गांधींनी मोठा शोध लावला, त्यांचा सत्कार करा- अण्णा हजारेंची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- तंबाखू व सिगारेटमुळे कॅन्सर होत नसल्याचा निष्कर्ष अहमदनगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधींनी काढल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिलीप गांधींनी फार मोठा शोध लावला आहे. त्यामुळे त्यांचा एखादा मोठा पुरस्कार देऊन सत्कार करायला हवा अशी उपरोधिक टीका केली आहे.
भारतात तंबाखू व सिगारेटमुळे कॅन्सर होत असल्याचे कुठलाही पुरावा उपलब्ध नाही तसेच भारतात या प्रकारचा कोणताही अभ्यास करण्यात आलेला नाही. यासंबंधीची जे काही संशोधन झाले व निष्कर्ष काढले आहेत ते सर्व विदेशी लोकांशी संबंधित आहेत. त्याचा भारताशी काहीही संबंध नाही. त्यामुळे सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरचा आरोग्यास हाणीकारक हे वैधानिक इशार्‍याचे पोस्टर आकाराने मोठे करण्याची काहीही गरज नाही, असा अहवाल खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने केंद्र सरकारला दिला आहे. त्यामुळे गांधी यांच्यावर मोठी टीका होत आहे. उद्योगपतींच्या भल्यांसाठी जनसामान्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार किळसवाणी व मानवतेच्या विरोधात आहे अशी जनभावना बनली आहे. त्यामुळेच अण्णांनी केलेल्या टीकेला महत्त्व आहे.
तंबाखूजन्य उत्पादनांमुळे कर्करोग होतो, असे कुठलाही भारतीय अभ्यास सांगत नसल्याचा अहवाल भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समितीने दिला आहे. तंबाखूमुळे कर्करोग होतो असे सांगणारे अहवाल परदेशातील आहेत, भारतात याबाबत अभ्यास झालेला नाही असेही गांधींनी संसदीय समितीच्या अहवालात नमूद केले आहे.
पुढे वाचा, तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे भारतात दरवर्षी 80 हजार लोक पडतात... मृत्यूमुखी.. मुंबईतील टाटा कॅन्सर संशोधन संस्थेचा अहवाल काय सांगतो वाचा...
तंबाखू उत्पादन करणा-या उद्योगपतींचे हित जोपसण्यासाठी दिलीप गांधींचा चुकीचा अहवाल...
बिडी बिडी उद्योगपती भाजप खासदाराकडून धूम्रपानाचे समर्थन..