आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थेच्या नावातून 'भ्रष्टाचार' शब्द हटवणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ- अण्णा हजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आमच्या संस्थेच्या नावातील भ्रष्टाचार हा शब्द काढणार नाही. प्रसंगी कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात जाऊ असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. अण्णा हजारेंच्या संस्थेसह 16 सेवाभावी संस्थांना भ्रष्टाचार हा शब्द वगळण्यासाठी पुणे धर्मदाय आयुक्तांनी नोटीस बजावली आहे.
याबाबत अण्णा हजारे म्हणाले, भ्रष्टाचार रोखण्यासाठी माहिती अधिकारासह अनेक कायदे करून सहा मंत्री आणि 400 अधिकाऱ्यांना आम्ही घरी बसवले आहे. आमचा कारभार पारदर्शक आहे. सरकारने स्थापन केलेल्या भ्रष्टाचार समित्यांवरही आमचेच प्रतिनिधी घेतले. संस्थेच्या नोंदणीवेळीच आक्षेप का घेतला नाही असा सवाल करीत संस्थेचे नाव बदलण्याचा प्रश्नच येत नसल्याचे अण्णांनी म्हटले आहे.
अण्णा हजारे यांना त्यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन संस्थेचे नाव बदलण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली आहे. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी पाठवलेल्या या नोटिशीत अण्णांनी संस्थेच्या नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे त्यांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम कोणत्याही संस्थेचे नसून ती सरकारची जबाबदारी असते. अशा प्रकारच्या संस्था शासकीय कार्यालयात जाऊन अनेकांना त्रासही देतात. संस्थांचे काम धार्मिक, समाजसेवेशी संबंधित असते. त्यामुळे संबंधित संस्थांनी नावातून भ्रष्टाचार हा शब्द वगळावा, असे या नोटिशीत स्पष्टपणे म्हटले आहे. त्यासाठी अण्णांना 15 दिवसांची मुदत दिली. इतर काही संस्थांनाही अशीच नोटीस पाठवण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...