आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपक्ष नगरसेवकाने अण्णांच्या फतव्याला दाखवली केराची टोपली

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या छायाचित्रांचा वापर केल्यास फौजदारी कारवाई करण्यात येईल, हा इशारा म्हणजे 'अण्णांचा फतवा' आहे आणि तो आपण मानणार नाही, अशी भूमिका एका अपक्ष उमेदवाराने घेतली आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक मारुती भापकर यांनी अण्णांच्या आदेशाचे उल्लंघन करणार असल्याचे म्हटले आहे. अण्णा आणि त्यांच्या टीमने माझ्याविरोधात फौजदारी कारवाई करावी. मी परिणामांची चिंता करीत नाही, असे सांगत अण्णांनी असे फतवे जारी करू नयेत, असे भापकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. मात्र, त्यांच्या नावाचा गैरवापर करण्यासाठी काही उमेदवार त्यांचे छायाचित्र आपल्या फलकावर वापरण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे आढळून आल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा अण्णांचे वकील अ‍ॅड. मिलिंद पवार यांनी शनिवारी एका पत्रकाद्वारे दिला.
या निवडणुकीत अनेक उमेदवारांनी अण्णांची भेट घेऊन त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अण्णांना कोणत्याही उमेदवारास किंवा पक्षास, आघाडीस अधिकृत लेखी अथवा तोंडी पाठिंबा दिलेला नाही. अशा प्रकाराचा पाठिंबा देण्याची इच्छा अण्णांची नसून त्यांनी यापूर्वी तसे जाहीर केले आहे.
असे असतानाही व अण्णांनी याबाबत जाहीर करूनही काही उमेदवारांनी अण्णांचे छायाचित्र अहवालात प्रसिद्ध केलेले आहे. त्यांच्यावर आम्ही कायदेशीर फौजदारी कारवाई करणार आहोत. यापुढे कोणीही अण्णांचे छायाचित्र अथवा नामोल्लेख उमेदवारांनी त्यांच्या अहवालात, पत्रकात, फलकावर करू नये व मतदारांनी असा पाठिंबा गृहीत धरू नये. कोणी तसे केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, असे पवार यांनी कळवले आहे.
अण्णांचे छायाचित्र वापरल्यास फौजदारी
अण्णा, ताकाला जाऊन भांडे लपवू नका : मुख्यमंत्री
अण्णांच्या आंदोलनाची ऊर्जा पडद्यावर !