आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्णांना रक्तदाबाचा त्रास, पुण्यातील रूग्णालयात दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्य़ेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी त्यांना पुण्यातील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अण्णांना मूत्रपिंडाचाही त्रास होत असून, अण्णांचे छोटेसे ऑपरेशन होण्याची शक्यता आहे.
सोमवारी अण्णांचा रक्तदाब कमी अधिक होऊ लागल्याने त्यांना त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी अण्णांना तीन-चार दिवस रूग्णालयात राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अण्णांनी रूग्णालयात राहण्यास परवानगी दिली. अण्णांची प्रकृती ठीक असून, रक्तदाब कमी अधिक होत असल्याने तीन-चार दिवस विश्रांतीची गरज असल्याचे रूग्णालयावतीने सांगण्यात आले आहे.
आणखी पुढे वाचा...