आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare, Trustees Of NGO Suspended For Using ‘anti corruption’ In Organization’s Name

अण्णा हजारेंसह सर्व विश्वस्तांचे निलंबन; वगळला नाही ‘भ्रष्टाचार’ शब्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे/नगर- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्यासह सर्व विश्वस्तांना ‘भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन न्यास’ या संस्थेतून निलंबित करण्यात आले आहे. या न्यासाच्या नावातील ‘भ्रष्टाचार’ या शब्दाला आक्षेप घेत या संस्थेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या अण्णांना निलंबित करून संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली.

भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन या सार्वजनिक न्यासाचे विश्वस्त म्हणून अण्णा काम पाहत होते. मात्र भ्रष्टाचार निर्मूलन हे शासनाचे काम असल्याने तो न्यासाचा उद्देश ठरू शकत नाही, असे धर्मादाय आयुक्तालयातर्फे सांगण्यात आले. नावातील ‘भ्रष्टाचार’ शब्द वगळण्यासंदर्भात न्यासाला नोटीसही पाठविण्यात आली होती. तरीही अण्णांनी दुर्लक्ष केल्याने आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला."अण्णांचे सामाजिक काम लक्षात घेऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी वेळोवेळी देण्यात आली होती. त्यास अण्णांनी प्रतिसाद दिल्याने त्यांच्या विरोधातील आरोप निश्चित करण्यात आले. आदेशाचे पालन केल्याने अंतिम निकाल लागेपर्यंत अण्णांना निलंबित केले," अशी माहिती पुणे विभागाचे धर्मादाय सहआयुक्त शि. ग. डिगे यांनी दिली. या संस्थेवर आता धर्मादाय आयुक्तालयातील एक निरीक्षक प्रशासक म्हणून काम पाहतील.