आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anna Hazare Wrote Letter To Prime Minister Of India.

लोकपाल नियुक्तीसाठी अण्णांचे पंतप्रधान मोदींना पत्र, वाचा संपूर्ण पत्र...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अण्णा हजारेंचे संग्रहित छायाचित्र)
पुणे- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच पत्र लिहून लोकपाल नियुक्त करण्याबाबत आठवण करून दिली आहे. याचबरोबर पंतप्रधान बनल्यानंतर मोदींशी प्रथमच संवाद साधत असल्याने पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
अण्णांनी मोदींना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, आज (28 ऑगस्ट) जनलोकपाल आंदोलनाला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. एप्रिल 2011 मध्ये आंदोलनाला प्रारंभ झाल्यानंतर 15 ऑगस्ट 2011 नंतर निर्णायक आंदोलन सुरु झाले होते. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी लोकपाल विधेयक आणण्याबाबत एक समिती स्थापन केली होती. त्यावेळी विरोधी पक्ष नेता म्हणून भाजपनेही या लोकपाल विधेयकाला पाठिंबा दिला होता. हे विधेयक संसदेने डिसेंबर 2013 मध्ये बहुमताने मंजूर केले होते. आता मी तुम्हाला आठवण करून देत आहे की, देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी लवकरात लवकर लोकपाल व राज्यांत लोकायुक्तांची नियुक्ती करावी, असे अण्णांनी मोदींकडे अपेक्षा व्यक्त केली आहे.
अण्णांनी पुढे म्हटले आहे की, तुम्ही 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटले होते की, देशातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी माझे सरकार कटिबद्ध आहे. लोकपाल नियुक्तीबरोबरच इतरही काही विधेयक संसदेत मंजूर करणे व काहींत सुधारणा करमे गरजेचे आहे. ज्याद्वारे देशातील भ्रष्टाचाराला व विविध कृप्रथांना आळा बसेल. याचबरोबर citizen's charter bill, prevention of bribery of foreign public & official bill, judicial standards & accountability bill, money laundering bill, publci procurement bill आदी विधेयके मंजूर करावीत/सुधारणा कराव्यात अशी विनंती केली आहे.
याचबरोबर जमिन अधिग्रहण विधेयक हे उद्योगधार्जिणे बनविण्यात आले आहे यात सुधारणा करण्याची गरज आहे. यात शेतक-यांवर अन्याय होता कामा नये. पर्यावरणांशी संबंधित धोरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कस्तुरीरंगन समितीने सुचवलेल्या शिफारशीकडे दुर्लक्ष केल्याने लवासा सारखे पर्यावरणाला हानी पोहचवतील अशा योजना पुढे येत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचार नष्ट करण्याबरोबर याबाबतीतही आपण लक्ष घालचाल असा विश्वास असल्याचे सांगत पुन्हा एकदा मोदी सरकारचे अभिनंदन करून अण्णांनी पत्र थांबवले आहे.
पुढे वाचा, स्लाईडच्या माध्यमातून अण्णांनी मोदींना लिहलेले जसेच्या तसे पत्र...