आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतरा दास खून प्रकरण; 25 हजारांचे बक्षीस जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- संगणक अभियंता अंतरा देबानंद दास  (२३, मु. रा. पश्चिम बंगाल) या तरुणीची अज्ञात हल्लेखाेराने २३ डिसेंबर २०१६  राेजी धारदार शस्त्राने वार करून तळवडे येथे हत्या केली हाेती. याप्रकरणी पाेलिसांना अद्यापपर्यंत हल्लेखाेर न सापडल्याने पुणे ग्रामीण पाेलिसांनी सदर खून प्रकरणातील अाराेपींची माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले अाहे.   

अंतरा दास ही तळवडे येथील कॅपजेमिनी कंपनीत काम करत हाेती व निगडीतील सिंधुनगर येथे राहावयास हाेती.  २३ डिसंेबर २०१६ राेजी ती रात्री साडेअाठ वाजेच्या सुमारास कॅपजेमिनी कंपनीतून कामावरून पायी घरी जात असताना तळवडे गावाच्या हद्दीत 
 
कॅनेब चाैकातील हाॅटेल 
ड्रीमसमाेरील फुटपाथवर एका अनाेळखीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तिच्या डाेक्यात, मानेवर घाव घालून तिचा निर्घृण खून केला. पाेलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल  झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...