आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतरा दास खून प्रकरण : माहिती देणाऱ्यास 25 हजाराचे बक्षीस, पुणे ग्रामीण पोलिसांची घोषणा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून झालेली अंतरा दास. - Divya Marathi
खून झालेली अंतरा दास.
पुणे- आयटी इंजिनियर अंतरा दास खूनप्रकरणाची माहिती देणाऱ्यास 25 हजाराचे बक्षीस पुणे ग्रामीण पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. तळवडे 7 महिन्यांपुर्वी येथे अंतरा दासचा खून झाला होता. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
 
एकाला झाली होती अटक
देहूरोड पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटकही केली होती. मात्र, तपासाच्या दृष्टीने पुरेशी माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणी अधिक माहिती असल्यास देण्याचे आवाहन पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे. योग्य माहिती देणाऱ्यास पोलिसांकडून 25 हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 
 
कधी झाला होता अंतराचा खून ?
कॅपजेमिनी कंपनीत अंतरा दास कामाला होती. डिसेंबर 2016 मध्ये तिचा खून झाला होता. तळवडे एमआयडीसी परिसरात भर रस्त्यात रात्री तिचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी संतोष कुमारला पोलिसांनी बंगळुरुतून अटक केली होती. संतोष हा मूळचा बिहारचा असून तो बंगळुरुमधील एका आयटी कंपनीत काम करत होता.

अंतरा बंगळुरूमध्ये ट्रेनिंगला असताना तिची संतोषशी ओळख झाली होती. तेव्हा पासून तो तिच्या संपर्क होता. तिच्यावर तो एकतर्फी प्रेम करत होता. तसेच त्याने अंतराला लग्नाची मागणीही घातली होती. मात्र, अंतरा लग्न करण्यास तयार नव्हती. अंतराने संतोषचा मोबाईल नंबर ब्लॉक केला होता. 
 
अंतरा ही तळवडे येथील कॅपजेमिनी या कंपनीत एप्रिल 2016 पासून नोकरी करत होती. नेहमी कंपनीची कॅब घेऊन जाणारी अंतरा 23 डिसेंबर रोजी रात्री तळवडे येथील एका चौकातून पायी जात होती. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने तिच्या डोक्यावर आणि मानेवर धारदार हत्याराने वार केले आणि पसार झाला. अंतरा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्यावेळी तेथून जाणाऱ्या सत्येंद्र सिंपी यांनी तिला त्वरित उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. अंतरा दासच्या खूनानंतर पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आला होता. 

 
बातम्या आणखी आहेत...