आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेमाँ यांच्यावर जादूटाेणा कायद्यान्वये कारवाई करा : डॉ. दाभोलकर यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राधेमाँ नामक तथाकथित देवीने मांडलेल्या अाध्यात्मिक बाजाराचे दर्शन चक्रावून साेडणारे अाहे. समाजसुधारकांच्या महाराष्ट्रात बुवाबाजीला थारा असणार नाही, ही अपेक्षा त्यामुळे फाेल ठरली अाहे. राधेमाँ दाेषी अाढळल्यास तिच्यावर जादूटाेणाविराेधी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस डाॅ. हमीद दाभाेलकर व राज्य कार्यवाह मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. हमीद म्हणाले, जादूटाेणा कायद्यातील कलम पाचप्रमाणे अापल्यात अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्तीत अतींद्रिय शक्ती संचारली असल्याचा अाभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीचे सांगणे न एेकल्यास वाईट परिणाम हाेतील अशी इतरांना धमकी देणे, फसवणे हा दखलपात्र गुन्हा अाहे. मुंबईस्थित गुप्ता कुटुंबातील निकी गुप्ता या महिलेने िदलेल्या तक्रारीची अाणि राधेमाँच्या एकूणच अाध्यत्मिक दरबाराची पाेलिसांनी कसून चाैकशी करावी. राधेमाँ अाणि संत यांची तुलनाच हाेऊ शकत नाही. ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा हे निष्कलंक संत हाेते, असेही ते म्हणाले. अंनिसचे संस्थापक डाॅ.नरेंद्र दाभाेलकर यांच्या हत्येला २० अाॅगस्ट राेजी दाेन वर्षे पूर्ण हाेत आहेत. मात्र, अजूनही मारेकऱ्यांपर्यंत पोलिसांना पोहोचता आले नाही. या पार्श्वभूमीवर अंनिसच्या वतीने २० अाॅगस्ट राेजी निषेध रॅली व सभेचे अायाेजन करण्यात अाले अाहे.

राधेमाँ ऐश्वर्यात रमणाऱ्या
माणसांना नीतिमूल्ये शिकवून उन्नत जीवन जगण्याची प्रेरणा देणारे धार्मिक तत्त्वज्ञान हाेते. याउलट राधेमाँ एेश्वर्यात लाेळणाऱ्या अाणि स्वत:ला देवीचा अवतार मानणाऱ्या बाई अाहेत. त्यांनी काेणताही ग्रंथ लिहिलेला नाही. त्यांना अाध्यात्मिक नीतिमूल्ये देणारे विचार मांडता येत नाहीत. काेणाच्याही दबावाला बळी न पडता सरकारने या भाेंदूगिरीची चाैकशी करावी. राज्यभर काेणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेद्वारे हाेणाऱ्या फसवणुकीस चाप बसावा यासाठी जादूटाेणाविराेधी कायद्यात दुरुस्ती करावी. देशपातळीवर जादूटाेणाविराेधी कायदा हाेण्यासाठी अंनिस पावले उचलत अाहे.
बातम्या आणखी आहेत...