Home | Maharashtra | Pune | anupam kher is new president of pune FTII

पुणे: एफटीआयआयच्या अध्यक्षपदी अनुपम खेर, पत्नी किरण म्हणाल्या, काम आव्हानात्मक

दिव्यमराठी वेब टीम | Update - Oct 12, 2017, 03:29 AM IST

पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्

 • anupam kher is new president of pune FTII
  एफटीआयआयच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  पुणे- पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गजेंद्र चौहान यांची 2015 मध्ये अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, त्यांना मोठा विरोध झाला होता. त्यामुळे मार्च 2017 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण होताच चौहान यांनी तेथून काढता पाय घेतला होता.
  आपल्या 14 महिन्याच्या कार्यकाळात चौहान फक्त एकदाच संस्थेत मीटिंगसाठी पोहचले होते. गजेंद्र चौहान यांची मोदी सरकारने एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी 139 दिवस आंदोलन केले होते. त्यातील काहींनी उपोषणही केले होते.
  विद्यार्थ्यांचा विरोध असल्याने चौहान यांनी कॅम्पसमध्ये जाणे टाळले होते त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. सोबतच त्यांच्या कार्यक्षमतेबाबत खुद्द बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यामुळेच विद्यार्थ्यांनीच त्यांना जोरदार विरोध केला. केंद्र सरकारने नियुक्ती केल्यानंतर तब्बल सात महिन्यांनी कारभार हाती घेतला होता. त्याआधी तेथील विद्यार्थ्यांनी पुणे, हैदराबादपासून दिल्लीतील जंतर-मंतरपर्यंत विरोध-आंदोलन केला होता.
  एफटीआयआयचे अध्यक्षपद भूषविणे हे एक आव्हानात्मक काम आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार आणि अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी दिली आहे. दरम्यान, अनुपम खेर यांच्या निवडीचे विद्यार्थ्यांसह फिल्मजगातून स्वागत होणे अपेक्षित असले तरी विरोधकांकडून ते भाजपशी संबंधित असल्याने त्यांची निवड झाल्याचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.
  पुढे स्लाईडद्वारे पाहा, यासंबंधित माहिती...
 • anupam kher is new president of pune FTII
  गजेंद्र चौहान हे भाजपशी संबंधित असल्याने दुय्यम दर्जाचा अध्यक्ष दिल्याचे एफटीआयआय विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
 • anupam kher is new president of pune FTII
  एफटीआयआयचे अध्यक्षपद भूषविणे हे एक आव्हानात्मक काम आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या खासदार आणि अनुपम खेर यांच्या पत्नी किरण खेर यांनी दिली आहे.
 • anupam kher is new president of pune FTII
  अनुपम खेर यांच्या नियुक्तीनंतर अंजली दमानिया यांनी केलेले टि्वट...
 • anupam kher is new president of pune FTII

Trending