आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FTII मध्ये अचानक पोहचले अनुपम खेर, विद्यार्थ्यांशी संवाद साधत केले सहभोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी साेमवारी पुण्यातील फिल्म अॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाेबत जेवण घेऊन त्यांच्या विविध समस्यांवर चर्चाही  करून त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडण्याचे आश्वासन  त्यांना दिले.
 
विद्यार्थ्यांना दिल्या अॅक्टिंगच्या टिप्स
- जेवण केल्यानंतर अनुपम खेर एका वर्गात गेले आणि त्यांनी विद्यार्थ्यांना अॅक्टिंगच्या टिप्सही दिल्या.
- खेर म्हणाले की, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर त्यांनी केलेल्या बऱ्याचशा मागण्या मला रास्त वाटल्या. त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु. सगळ्या समस्या एक किंवा दोन दिवसात सुटू शकत नाहीत.
- अनुपम खेर यांनी आपल्या FTII भेटीविषयी कुणालाच सांगितले नव्हते पण त्यांनी हे आपल्या ट्विटर अकाऊंटवर लाइव्ह केले.
- त्यांनी म्हटले की, मी त्या संस्थेत जात आहे. ज्या संस्थेत मी 1978 मध्ये शिक्षण घेतले होते. तिथेच माझ्यातील अभिनेत्याचा पाया रचला गेला.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...