आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेश्मा भाेसले यांच्यासह बहिरट यांचा अर्ज अवैध़, अपक्ष म्हणून निवडणूक लढावी लागणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राष्ट्रवादीचे अामदार अनिल भाेसले अाणि विद्यमान नगरसेविका रेश्मा भाेसले यांनी पुणे विद्यापीठ भागातील प्रभाग क्रमांक सात (ड) मधून एेनवेळी भारतीय जनता पक्षाकडून एबी फाॅर्मसह अापला उमेदवारी अर्ज घेतला हाेता. मात्र, त्यांच्यापूर्वी भाजपकडून सदर जागेवर अर्ज दाखल केलेले सतीश बहिरट यांनी अाक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अायाेगाच्या अधिकाऱ्यांनी अर्ज छाननी वेळी भाेसले व बहिरट यांच्या अर्जावर अाक्षेप घेत त्यांचा अर्ज अवैध ठरवल्याने भाजपच्या अधिकृत कमळ या चिन्हावर दाेघांनाही निवडणूक लढविता येणार नसल्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले. 
  
रेश्मा भाेसले यांनी अाॅनलाइन अर्ज करताना राष्ट्रवादीच्या नावाने करून पक्षाचे चिन्ह अर्जात वापरले हाते. मात्र, प्रत्यक्षात फाॅर्म देताना बीजेपीचा ए व बी फॉर्म जाेडला. भाजपने रेश्मा भाेसले या पक्षाच्या अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले; पण अर्ज चुकीचा ठरवल्याने त्या पक्षाच्या उमेदवार ठरू शकल्या नाहीत. सतीश बहिरट यांनाही भाजपने ए व बी फॉर्म िदला हाेता, पण पक्षाने रेश्मा भाेसले अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितल्याने त्यांचा ए व बी फॉर्म रद्द करण्यात आला.  त्यामुळे अाता सात ड प्रभागातून भाजपचा अधिकृत उमेदवार नाही. भाेसले यांच्या वकिलांनी या प्रकरणात वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज करून दाद मागितली अाहे.
   
याबाबत सतीश बहिरट म्हणाले, मी गेल्या २५ वर्षांपासून भाजपचे काम करत असून एेनवेळी भाेसले यांना तिकीट देण्यात अाले. तिकीट मिळण्यासाठी पक्षनिधी म्हणून भाजपने आपल्याकडून दाेन लाख रुपये घेतले. त्यानंतर मला ए व बी फाॅर्म िदला हाेता. अचानकपणे भाेसले यांनाही ए व बी फाॅर्म देण्यात अाला. माझा अर्ज बाद ठरवल्याने मला कमळ चिन्हावर निवडणूक लढविता येत नसली तरी अपक्ष म्हणून मी लढणार अाहे.

अभिजित शिवरकर यांचा अर्ज अवैध   
राष्ट्रवादीचे महापाैर प्रशांत जगताप यांच्याविराेधात काँग्रेसचे अभिजित शिवरकर यांनी प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी अर्ज भरला हाेता. मात्र, शनिवारी अर्ज छाननीदरम्यान शिवरकर यांच्या अर्जात तांत्रिक चुका काढून त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात अाला. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती अाधीच शिवरकर निवडणुकीच्या अाखाड्यात बाद ठरले.
बातम्या आणखी आहेत...