आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Automotive Research Association Of India (ARAI) Has Set Up A New Vehicle Crash Test Centre At Chakan, Pune.

चाकणमध्ये \'ARAI\'चे नवे उपकेंद्र वर्षभरात कार्यान्वित होणार, 210 कोटींची गुंतवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देशातील वाहन उद्योगाचा सतत वाढता वेग लक्षात घेउन ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) ने पुण्याजवळ चाकण येथे विस्तारकेंद्र उभारले आहे. यासाठी केंद्र सरकारने साह्य केले असून, एकूण 210 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. हे उपकेंद्र या वर्षअखेरीस कार्यान्वित होईल, अशी माहिती संस्थेच्या संचालिका रश्मी उर्व्धरेषे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
एआरएआयच्या वतीने लवकरच देशात नाशिकसह अन्य ठिकाणी देखिल उपकेंद्रांची उभारणी करण्यात येईल, असे सांगून उर्ध्वरेषे म्हणाल्या, देशात वाहन उद्योग प्रचंड गतीने विस्तार पावत आहे. त्यासाठी वाहनविषयक संशोधनाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. वाहनांप्रमाणेच रस्ते, वाहनांची संरचना, आराखडे, डिझाईन यात सतत नाविन्य आणले जात आहे. नवे प्रयोग होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात नाशिक येथे तसेच देशात राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगाणा अशा पाच ठिकाणी ‘चाचणी आणि प्रमाणपत्र केंद्रे’ उभारण्यात येणार आहेत.
भारतीय मानकानुसार नवी वाहन क्रेश चाचणी सुविधा तयार होत आहे. त्यासाठी ताशी 56 किमी वेगाचे बंधन असेल. तसेच इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याबाबत ई-20 हा अभ्यास केला जात आहे. वैद्यकीय रुग्णवाहिकांसाठी मानके तयार केली जात आहेत. 15 एप्रिलपासून ती अमलात येतील. एआरएआयच्या वतीने येत्या 21 ते 24 जानेवारी दरम्यान वाहन तंत्रज्ञानावर जागतिक परिषदेचे आयोजनही करण्यात येणार आहे. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते या परिषदेचे उद्घाटन असतील तर सांगतेसाठी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी येणार आहेत.
एआरएआयचा सुवर्ण महोत्सव- येत्या दोन वर्षांनी संस्थेचा सुवर्ण महोत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त संस्थेने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. तसेच काही योजनाही राबवण्यात येणार आहेत. वाहनसुरक्षा, रस्तेसुरक्षा आणि ग्राहक सुरक्षा ही त्याची त्रिसूत्री असेल, असे रश्मी उर्ध्वरेषे यांनी सांगितले.