आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्करामार्फत एल्फिन्स्टन पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्णय योग्य; लष्करप्रमुख बिपीन रावत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लष्करप्रमुख बिपीन रावत (संग्रहित फोटो) - Divya Marathi
लष्करप्रमुख बिपीन रावत (संग्रहित फोटो)
पुणे- एल्फिन्स्टन येथील पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल चेंगराचेंगरीसारख्या घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी या पुलांचे काम वेगाने पूर्ण करण्यात येईल. या नंतर लष्करामार्फतच या पुलांचे काम पूर्ण केल्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल, असे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. 
 
बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनला 10 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील धन्वंतरी सभागृहात लष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या 14 शाळांचा व शिक्षकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे उपस्थित होते. 

रावत म्हणाले, डोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. सीमेवर सध्या शांतता आहे. देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत 200 विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश केला आहे. 
 
भारतीय जवानांना भेटवस्तू तसेच राख्या पाठवण्याचे बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगून रावत म्हणाले, भारतीय लष्करातील जवान हा सीमेवर लढत असतो. 24 तास तो आपले कर्तव्य बजावत असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांनी पाठवलेली शुभेच्छापत्रे तसेच राख्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो. काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करातर्फे ऑल आऊट मोहीम राबविण्यात आहे. मात्र, ही समस्या चर्चेने सोडवण्यासाठी केंद्र सरकारने माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. यावर रावत म्हणाले, काश्मीर प्रश्न  सोडवण्यासाठी चर्चेद्वारे ते प्रयत्न करतील, लष्कर मात्र आपले काम सुरूच ठेवेल.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो 
बातम्या आणखी आहेत...