आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराच्या मदतीने बचावले सिन्नरचे पर्यटक; अपघातानंतर जमावाच्या तावडीतून केली सुटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर- उत्तराखंड, लेह-लडाख अाणि काश्मीरच्या दाैऱ्यावर गेलेल्या सिन्नरमधील तरुण पर्यटकांच्या टेम्पाे ट्रॅव्हलरला श्रीनगरजवळ अनियंत्रित मारुती कारने धडक दिली. त्यात कारमधील दाेन काश्मिरी रहिवासी जागीच ठार झाले. या तरुणांनीच मदतकार्य केलेे. मात्र, गर्दी करणाऱ्या जमावाने  पर्यटक व त्यांच्या वाहनास लक्ष्य करताच जवानांच्या तुकडीने धावत येऊन त्यांना सुरक्षाकवच दिले. बाका प्रसंग असताना माेक्याच्या वेळी सैनिक बांधवांची मदत मिळाली नसती तर अापण घरी परतलाे असताे की नाही... या विचाराने पर्यटकांच्या चेहऱ्यावर अाजही भीती  दिसत आहे.   

उत्तराखंडमधील केदारनाथ, बद्रीनाथचे दर्शन घेऊन सिन्नरचे पर्यटक लेह-लडाखचा राेमांच अनुभवून  काश्मीरमध्ये अाले, तेव्हा अमरनाथ यात्रेकरूंवर अतिरेक्यांनी केलेला हल्ला, पाठाेपाठ पर्यटकांची बस दरीत काेसळून झालेला अपघात अाणि सुरक्षा दलांच्या अतिरेक्यांसाेबत सुरू असलेल्या धुमश्चक्रीमुळे वातावरण तणावपूर्ण हाेते. सिन्नरहून टेम्पाे ट्रॅव्हलर घेऊन गेलेल्या या तरुणांना प्रवासात कटू अनुभवांना सामाेरे जावे लागत असतानाच श्रीनगरपासून ४० किमी अंतरावरील अवंतीपुरा  चाैफुलीवर भरधाव कार त्यांच्या वाहनावर येऊन धडकल्याने उलटली. या तरुणांनी तत्काळ मदतकार्य केले. कारचालक व एक सहप्रवासी जागेवरच ठार झाला. अपघातस्थळी जमलेल्या गर्दीने या पर्यटकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी जवानांची तुकडी मदतीला अाली. त्यांनी पर्यटकांना सुरक्षाकवच दिले. 

वाहनांची व्यवस्था
पर्यटकांना वाहनसुविधा व धीर देऊन जवानांनी त्यांची मीरपूरच्या लष्करी तळावर पाठवणी केली. अपघातात त्यांना झालेल्या जखमांवर अाैषधाेपचार केले. भाेजन व अन्य साेयी दिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जम्मू विमानतळापर्यंत जाण्यासाठी वाहनाची माेफत सुविधाही उपलब्ध करून दिली.  पर्यटक दुसऱ्या दिवशी सिन्नरला परतले, तेव्हा कुठे त्यांचा जीव भांड्यात पडला. जवानांनी संरक्षण दिल्यामुळेच सुखरूप घरी येऊ शकलाे, असे सांगत ते काश्मीरमधील तैनातीस असलेल्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...