आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉम्ब विकायला घेऊन आलेला आरोपी अटकेत; काळेवाडीतील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - पिंपरीतील काळेवाडी भागात जिवंत हातबॉम्ब विक्रीस घेऊन आलेल्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे. विकी सावंत (रा.काळेवाडी, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. आपणास हा हातबॉम्ब एका अल्पवयीन मुलाकडून मिळाला असल्याचे त्याने वाकड पोलिसांना सांगितले आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. ते मुलाचा शोध घेत आहेत.

काळेवाडी येथे राहणारा १३-१४ वर्षांचा मुलगा हा दीड महिन्यापूर्वी पवना नदीपात्रात आईसोबत कचरा वेचण्यास गेला होता. त्या वेळी त्याला पाण्याजवळ एक हातबॉम्बसारखी वस्तू मिळाली होती. तो ती वस्तू घेऊन जात असताना सराईत गुन्हेगार विकी सावंत याने त्याला हेरले. ‘ही वस्तू दे, मी तुला नंतर बक्षीस देतो,’ असे सांगून सावंतने त्याच्याकडून घेतलेला हातबॉम्ब घरी आणून ठेवला. या बॉम्बची विक्री करण्यासाठी सावंत ग्राहक शोधत होता. बुधवारी दुपारी तो बॉम्बची विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली.

बॉम्बशोधक व नाशक पथकाने बॉम्बची तपासणीही केली. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलाकडे ही चौकशी सुरू केली आहे. सदर हातबॉम्ब कोठून व कशाप्रकारे त्या ठिकाणी आला याबाबत अधिक तपास केला जात आहे.