आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंटरनेटवर अश्लील मजकूर टाकणार्‍या महिलेला पुण्यात अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - धनकवडी परिसरात राहणार्‍या एका विवाहित महिलेची इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या वेबसाइटवरून अश्लील, धमकीवजा संदेश पाठवून बदनामी करणार्‍या एका महिलेस सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. किरण श्याम इदनानी (वय 46) असे आरोपी महिलेचे नाव असून तिच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण इदनानी हिने एका महिलेची बदनामी करणारी माहिती इंटरनेटच्या माध्यमातून एसएमएसद्वारे अनेकांना पाठविली होती. याप्रकरणी पीडित महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शैलजा जानकर यांनी आरोपी महिला अटक केली. न्यायालयाने तिची जामीनावर मुक्तता केली.