आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Art Of Living World Culture Festival Final Rehearsal Held At Sarasbhag

\'आर्ट ऑफ लिव्हिंग\'तर्फे पुण्यात पार पडली 40 प्रकारच्या वाद्यवृंद वादनाची रंगीत तालीम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यात आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने रविवारी (28 फेब्रुवारी) 40 प्रकारच्या विविध वाद्यांच्या वादनाची रंगीत तालीम पार पडली. या 40 प्रकारच्या वाद्यांवर 1300 हून अधिक वादक, कलाकारांनी शास्त्रीय संगीताच्या रचना सादर केल्या. पुण्यातील सारसबागेत रविवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.
श्री श्री रविशंकर यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या मानवता सेवेच्या 35 वर्षांच्या पूर्ततेच्या निमित्ताने या महिन्यात (11 ते 13 मार्च दरम्यान) दिल्लीत तीन दिवसांचा 'वर्ल्ड कल्चर फेस्टिवल' नावाचा सांस्कृतिक सोहळा आयोजित केला आहे. त्यात जगभरातील 152 देशांतील 35 हजारांपेक्षा अधिक कलाकार शास्त्रीय वाद्य- नृत्य, पारंपारिक आणि लोकनृत्य सादर करणार आहेत. या सोहळ्यात भारतातील 8500 हजारांहून अधिक कलाकार सहभाग घेणार असून त्यात महाराष्ट्रातील 1300 पेक्षा अधिक वादक यात वादन करणार आहेत.
दिल्लीतील 'वर्ल्ड कल्चर फेस्टिवल'मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील 1300 हून अधिक कलाकार पुण्यात सध्या जोरदार सराव करीत आहेत. याची रंगीत तालीम रविवारी प्रथमच झाली. या रंगीत तालमीला संगीत क्षेत्रातील व नागरिक उपस्थित होते.
सुप्रसिध्द सतारवादक रईस खान यांनी यात सहभाग घेतला होता. ते म्हणाले, संगीताच्या जागतिक संस्कृतीला बढावा मिळावा म्हणून गुरुदेव श्री श्री रविशंकर इतके मोठे कार्य करीत आहेत. मी यात भाग घेत आहे कारण माझ्यामुळे माझ्या शिष्यांनाही बढावा मिळेल. सुदैवाने माझ्या बंधूंना बंगलोर येथील आश्रामात गेल्या वर्षी गुरुदेवांसमोर सतार वादन करता आले. प्रवीण वाघ आणि दत्ता धोरमाले या दोन अंध बासरीवादकांचाही यात सहभाग आहे.
शास्त्रीय गायिका वृषाली काटकर म्हणाल्या, तणावमुक्त आणि हिंसामुक्त समाज हे श्री श्री रविशंकर यांचे स्वप्न आहे. संगीत म्हणजेच हार्मनी (सुरेलता / सलोखा). हार्मनी नसेल तर संगीत होऊ सहकार नाही. संगीताच्या माध्यमातूनच आपण सलोखा निर्माण करू शकतो.
वर्ल्ड कल्चर फेस्टिवलमुळे वेगवेगळे धर्म, देश आणि पार्श्वभूमी असलेल्या लोकांमध्ये सामंजस्य निर्माण होईल. जगभरातील नृत्य, संगीत आणि कला त्याचप्रमाणे योग यांच्या संपन्न अशा परंपरांच्या सादरीकरणामुळे, हा सोहळा म्हणजे आध्यात्मिक आणि धार्मिक गुरु, राजकारणी, शांतीदूत आणि कलाकार यांच्यासाठी जागतिक शांती आणि विविधतेत एकतेचा संदेश देणारे एक खास असे व्यासपीठ असेल, असा संदेश आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी यानिमित्ताने दिला आहे.