आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकोबांचे वंशज संमेलनाचे अध्यक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संत नामदेवांच्या कर्मभूमीत घुमान (पंजाब) येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक व संत तुकाराम महाराज वंशज डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली. त्यांचा हा परिचय....
डॉ. सदानंद श्रीधर मोरे, देहूकर
जन्म : २५ जून १९५२
शिक्षण : अकरावीपर्यंत देहू येथे, त्यानंतर पुण्यात स. प. महाविद्यालयातून तत्त्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी अहमदनगर येथील कॉलेजमध्ये अध्यापक
पुणे विद्यापीठातून ‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्युमन अ‍ॅक्शन’ या विषयावर पीएचडीचा प्रबंध, या प्रबंधास सर्वोत्कृष्ट प्रबंधाचा दामले पुरस्कार.
पीएचडी मिळवल्यावर पोस्ट डॉक्टरल संशोधनासाठी यूजीसीचे खास अनुदान, त्याअंतर्गत ‘कृष्ण – द मॅन अँड हिज मिशन’ या विषयावर संशोधन.
पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्राध्यापक, तसेच विविध अध्यासने, मंडळे यावर समन्वयक, संशोधक म्हणून काम.
केंद्र, राज्य शासनाच्या विविध समित्या, मंडळे यावर सल्लागार म्हणून काम
याशिवाय विविध ग्रंथ, नियतकालिके, वृत्तपत्रे यातून सातत्याने लेखन, संपादन
साहित्यसंपदा
लोकमान्य ते महात्मा – साहित्य अकादमीप्राप्त ग्रंथ, अन्य १५ पुरस्कार
तुकाराम दर्शन – राज्य शासनाचे पुरस्कार व अन्य दहा पुरस्कार, गर्जा महाराष्ट्र
कवितासंग्रह
संदर्भाच्या शोधात, बखर, वाळूचे किल्ले
नाटक
उजळल्या दिशा, शिवचरित्र
आगामी संकल्प
महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास
निवड अपेक्षितच
साहित्य संकृती मंडळावर मी आणि सदानंद मोरे यांनी काम केले आहे. संमेलनाचे ते अध्यक्ष होतील याची अपेक्षा होतीच. घुमान येथील संमेलनासाठीचा एक उचित अध्यक्ष या निवडीमुळे मिळाला आहे. संतांच्या भूमीत संत साहित्यिकाचा हा सन्मानच आहे.
- प्राचार्य रा. रं.बोराडे, साहित्यिक
नवा विचार मिळेल
मराठी साहित्यातील विचारवंत लेखक म्हणून डॉ. सदानंद मोरे यांचे मोठे स्थान आहे. तुकारामांच्या ज्ञानाचा वसा पुढे नेणारे डॉ. मोरे हे मोठे विचारवंत आहेत. त्यांची निवड अध्यक्षपदी झाली याचा अभिमान आहे. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातून नवा विचार साहित्य क्षेत्राला मिळेल.- दासू वैद्य, कवी
विचारवंताची निवड
डॉ.मोरे संत साहित्याचे गाढे अभ्यासकच नाही तर विचावंतही आहेत. लोकमान्य ते महात्मा आणि राजवाडे यांची त्यांनी केलेली समीक्षा असे महत्त्वपूर्ण ग्रंथ त्यांनी दिले आहेत. ब-याच वर्षांनंतर संत साहित्याच्या अभ्यासकाची निवड झाली आहे
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी अध्यक्ष
मोरेंची निवड सार्थ
या संमेलनात मराठी संत वाङ्मयावर वारकरी संप्रदाय व नामदेवांच्या कर्तृत्वावर चर्चा होणे अभिप्रेत आहे. या दृष्टीने वारकरी संप्रदायाचे अभ्यासक तुकाराम महाराजांच्या वंशाचे डॉ. सदानंद मोरे यांची निवड अगदी सार्थ ठरणारी अशीच आहे.
- डॉ. सुधीर रसाळ, समीक्षक