आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कृत्रिम गुडघ्यां’ची पुण्यात निर्मिती, विदेशी अवयवांपेक्षा 40 टक्के स्वस्तात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गुडघ्याची वाटी, नितंबाची हाडे (हिप) आदी सांधे रोपणासाठी लागणार्‍या कृत्रिम अवयवांची निर्मिती लवकरच पुण्याजवळ सुरू होत आहे. अस्थिरोगाने त्रासलेल्या भारतीय रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी याबाबतीत विदेशातून येणाºया कृत्रिम अवयवांवर आपला देश अवलंबून आहे. या आयातीला स्वदेशी कृत्रिम अवयवांचा पर्याय उपलब्ध होत आहे.
सध्या अमेरिका, जर्मनी या देशांतूने कृत्रिम अवयवांची आयात केली होते. तयार कृत्रिम अवयव आणण्याऐवजी कच्चा माल आयात करून त्यावर प्रक्रिया केल्यास कृत्रिम अवयवांच्या किमती 40 टक्क्यांनी स्वस्त होतील. गरीब, मध्यमवर्गीय रुग्णांना किफायती दरात कृत्रिम सांधे देण्यास आमचे प्राधान्य आहे,’ असे बायोराड मेडिसिस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे. एम. हेगडे यांनी सांगितले. कंपनीतर्फे 50 कोटी गुंतवणुकीचा कृत्रिम अवयव निर्मिती प्रकल्प पुणे आणि बंगळुरात सुरू होतोय. यातून वर्षाला एक लाख कृत्रिम अवयव तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
सातशे कोटींची बाजारपेठ
बदलत्या जीवनशैलीमुळे गुडघे, सांध्यांच्या तक्रारी असणाºया रुग्णांची संख्या भारतात वाढत आहे. केवळ गुडघा आणि ‘हिप’ या कृत्रिम अवयवांची भारतीय बाजारपेठ तब्बल सातशे कोटी रुपयांची असून दरवर्षी ती तीस टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.
सध्या या बाजारपेठेवर पूर्णत: बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वर्चस्व आहे.
मागणीनुसार निर्मिती
30 वर्षांच्या अ‍ॅथलिटपासून सत्तर वर्षांच्या वृद्धाच्या गरजेनुरूप कृत्रिम अवयव तयार करण्याचे उद्दिष्ट पुण्यातील प्रकल्पात ठेवण्यात आले आहे. यासाठी ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती यांचे साहाय्य घेण्यात आले असून अस्थिरोग संशोधनावर त्यांना मिळालेल्या पेटंटचे हक्क कंपनीने घेतले आहेत. लवकरच ‘मॉड्युलर गुडघा’ही बाजारात आणला जाणार आहे.