आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृत्रिम पावसाचा ‘गडगडाट’, कोरडी आशा, पैशांवर ‘पाणी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - गेल्या पंधरा दिवसांत नैऋत्य मोसमी पावसाने (मान्सून) ओढ दिल्याने चिंतित झालेल्या राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा केली आहे. सरकारची ही इच्छा दुष्काळग्रस्तांना किती पाणी देणार याबद्दल मात्र साशंकता व्यक्त हाेत आहे. कृत्रिम पावसाच्या यापूर्वीच्या प्रयोगांमधून पाऊसमानात किती टक्के वाढ झाली, याची नेमकी आकडेवारी शासनदरबारी उपलब्ध नाही. किंबहुना यापूर्वीच्या प्रयोगातून अपेक्षित पाऊस पडला नसल्याचेच समोर आले आहे. यातून फक्त सरकारी पैशाचा अपव्ययच झाला.

सरकारची संवेदनशीलता दाखवण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याची घोषणा करण्याचा प्रघात अलीकडच्या काळात राज्यकर्त्यांनी पाडला आहे. यापूर्वी सन २००३-०४ च्या दुष्काळी वर्षात तत्कालीन ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ सरकारने बारामती आणि शेगाव येथे कृत्रिम पावसाचा प्रयोग केला. यातून अपेक्षित पाऊस मिळाला नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी तेवढी झाली. कृत्रिम पावसाच्या एका प्रयोगाला दहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च होतो.

कृत्रिम पावसाच्या तंत्रज्ञानात उणीव नसल्याचे चीन, इस्रायल, थायलंड या देशांमधल्या अनुभवाने सिद्ध झाले आहे. या देशांनी कृत्रिम पाऊस उभारणारी कायमस्वरूपी यंत्रणा उभारली आहे. आपल्याकडच्या सरकारी नियोजनात व निर्णय प्रक्रियेत मात्र सातत्य नाही. दुष्काळाची चाहूल लागल्यानंतर कृत्रिम पावसाची आठवण राज्यकर्त्यांना होते. त्यामुळे अपेक्षित परिणाम साधला जात नाही. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या कृत्रिम पावसाच्या घोषणेचा धांडोळा ‘दिव्य मराठी’ने घेतला. दुष्काळाच्या छायेत असलेल्या निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या कोणत्या भागात कृत्रिम पावसाचे किती प्रयोग होणार आणि त्यातून किती पाऊस पडणार, याबद्दल अर्थातच अद्याप स्पष्टता नाही.

कमाल २० % वाढीचा दावा
गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत अालेल्या कृत्रिम पावसाचे देशातले पहिले प्रयोग १९५१ ते १९६६ या कालावधीत दिल्ली, आग्रा, जयपुर या भागात झाले. यानंतर ‘आयआयटीएम’ने सन १९७३ ते १९८६ दरम्यान महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटात सुमारे अकरा वर्षे प्रयोग केले. या ११ वर्षात १६० दिवस कृत्रिम पाऊस पाडण्यात आला. या दीर्घ प्रयोगाअंती या भागातल्या पाऊसमानात जेमतेम २० टक्के वाढ झाल्याचा निष्कर्ष निघाला.

पुढे वाचा... कृत्रिम पाऊस कशासाठी ?