आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनवतेबद्दल जोडे मारायचे का? अरुण कुदळे यांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - शिक्षणास शासनाची चौकट नको म्हणून संस्थेने मान्यता घेण्याचे टाळले. नंतरच्या काळात प्रयत्न करूनही मान्यता मिळू शकली नाही. पण म्हणून अभिनव प्रयोगासाठी संस्थेची पाठ थोपटायची की जोडे मारायचे, असा संतप्त सवाल पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठाचे अध्यक्ष अरुण कुदळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. शिक्षणमंत्री विनाेद तावडे यांची या विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी बाेगस असल्यावरून राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर कुदळे म्हणाले, ‘आमच्या पदव्यांना यूजीसीची मान्यता नाही, असा स्पष्ट उल्लेख पदव्यांवर केलेला असे. आम्ही कुठल्याही विद्यार्थी वा पालकांचे नुकसान केले नाही.’

‘१९८० मध्ये डॉ. मनोहर आपटे यांनी ज्ञानेश्वर विद्यापीठ संस्थेची स्थापना केली. त्या काळी अभियांत्रिकीचे महाविद्यालये कमी होती. परीक्षेत कमी गुण किंवा शिक्षणासाठी पैसे नसतील, अशा विद्यार्थ्यांसाठी येथे पदविका आणि पदवी अभ्यासक्रम सुरू केले होते. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे संस्थेचे कुलपती होतेे. या संस्थेतील शिक्षणाची व्याख्या वेगळी असल्याने यूजीसी किंवा एनआयसीटीसारख्या केंद्रीय संस्थांची मान्यता घेता पठडीबाज शिक्षणापेक्षा कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याचे संस्थेचे धोरण होते. मात्र न्यायालयाने ‘पदव्या देऊ नका’ अशी सूचना केल्यानंतर लगेच संस्थेने पदवी देणे बंद केले. २००८ पासून संस्थेत एकही प्रवेश झाला नाही अभ्यासक्रमही बंद झाला, असे कुदळे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...