आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे, फडणवीसांनाही नाेटीस देणार का? असदुद्दीन ओवेसींचा सरकारला सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - “मी जिवाची कधीही पर्वा करीत नाही. इथे आज जर माझा मृत्यू झाला तर मला इथेच दफन करा. आतापर्यंत काँग्रेस, भाजपला घाबरत राहिलो, यापुढे कोणालाही घाबरू नका,’ असे आवाहन एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मंगळवारी पुण्यातील सभेत केले.
 
‘उद्या उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अजित पवार यांनाही नोटिसा बजावणार का? त्यांच्या तोंडून फुले पडतात का? अजून किती नोटिसा बजावणार?’ असे प्रश्न उपस्थित करत अाेवेसींनी  सभेला परवानगी नाकारल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. पुणे विमानतळावर पोहोचताच ओवेसी यांना पोलिसांनी नोटीस बजावली. ‘महाराष्ट्रात आलो की नोटीस पाठवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने देखील यापूर्वी नोटिसा पाठविल्या. नागपूर आणि सोलापूरमध्ये सभा घेतली तिथे मात्र नोटीस  दिली नाही,’ असे ओवेसी यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...