आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashwagandha's Ayurvedic Medicine Get American Patent

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अश्वगंधा' च्या आयुर्वेदिक औषधीला अमेरिकन स्वामीत्व हक्क प्राप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - अश्वगंधा या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीपासून लसपूरकता वाढवणा-या घटकाच्या निर्मिती संशोधनाला अमेरिकी पेटंट मिळाले आहे. पुणे विद्यापीठाचा आरोग्य विज्ञान विभाग आणि केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान विभाग तसेच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या एकत्रित संशोधनाचा हा परिपाक आहे. ‘यूएस 850118 बी 2’ असा या अमेरिकी पेटंटचा क्रमांक आहे. या औषधाचे पेटंट भारतीय संशोधकांकडे असल्याने आता त्यावर कुणालाही दावा करता येणार नाही.


या संशोधन प्रकल्पात प्रमुख सहभाग असणा-या डॉ. सुरेश जाधव, डॉ. भूषण पटवर्धन, डॉ. मनीषा गौतम यांच्या नावाने सहा ऑगस्ट रोजी हे पेटंट देण्यात आले आहे.


कुठल्याही रोगावरील लसीची परिणामकारकता वाढवण्यासाठी ‘अश्वगंधा’ या वनस्पतीपासून तयार केलेला हा घटक वापरता येऊ शकतो, अशी माहिती डॉ. भूषण पटवर्धन यांनी दिली. पारंपरिक ज्ञानाचा वापर आधुनिक विज्ञानात कसा संयुक्तिक ठरतो, याचे हे उदाहरण आहे आणि म्हणूनच हे पेटंट महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.


काय आहे घटक
लसपूरक घटक तयार करण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीच्या मुळाचा भाग गरम पाण्यातून काढून त्याचा अर्क मिळवला जातो. तो गाळून त्याचा अतिसंहत अर्क तयार करतात. ब्यूटॅनॉलने त्यापासून सेंद्रिय अर्क मिळवतात. निर्वात पोकळीत त्याचे ऊर्ध्वपतन करून त्यातील द्रावक काढून 70 अंश सेल्सियस तापमानाला विथॅनलाइडने परिपूर्ण असा लसपूरक घटक तयार होतो. या घटकाच्या प्रत्यक्ष वापरापूर्वी अजून काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातील, असे सिरम इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक डॉ. सुरेश जाधव यांनी सांगितले.