आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरीचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन एेतिहासिक बनवणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवड - येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हाेणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काहींनी नाके मुरडली. पण त्याच वेळी डी. वाय. पाटील विद्यापीठ साेसायटीला त्याचे यजमानपद मिळाल्याने अनेकांनी अानंदही व्यक्त केला. हे संमेलन कसे हाेणार, याची उत्सुकता अाहेच. विद्यापीठाचे प्रमुख डी. वाय. पाटील यांनी ‘दिव्य मराठी’शी खास बातचीत करताना हे संमेलन एेतिहासिकच बनवणार असल्याचे स्पष्ट केले.
मुलाखत : पीयूष नाशिककर
अापल्याला यंदाच्या साहित्य संमेलनाचा मान मिळालाय...
पाटील : महामंडळाला जे ठिकाण याेग्य वाटले ते त्यांनी निवडले. जागा, मनुष्यबळ अाणि अार्थिक क्षमता हे निकष बघितले जातात. त्यानुसार त्यांना अामचे निमंत्रण याेग्य वाटले असावे कदाचित.

संमेलन भव्य हाेणार अशी अापली पहिली प्रतिक्रिया अाहे...
पाटील : हाेणारच. अापण संमेलनाचे अायाेजन भव्यदिव्य असेच करणार अाहाेत. हा साहित्याचा मेळावा अाहे. साहित्य अापल्याला ज्ञान देते म्हणजे हा एक प्रकारचा ज्ञानकुंभच असल्याने ताे ज्ञानकुंभ उच्च परंपरेला साजेसाच झाला पाहिजे. अाम्ही यापूर्वी भरवलेले संमेलन अाजही अनेकांच्या लक्षात अाहे.
म्हणजे काेल्हापूरचं...?
पाटील : काेल्हापूमध्ये झालेल्या ६५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे यजमान अाम्हीच हाेताे. तेथील संमेलनाची भव्यदिव्यता, दिंडी, कार्यक्रम, नियाेजन, साहित्यिकांच्या राहण्याची व्यवस्था, साहित्य रसिकांची व्यवस्था याविषयी अाजही चर्चा हाेते. असे संमेलन अाजवर झालेले नाही, याचा उल्लेख अनेक साहित्यिक करतात. त्याच्या उत्तम अायाेजनाची नाेंद इतिहासात झाली अाहे. त्यामुळे पिंपरीत हाेणारे साहित्य संमेलन त्यापेक्षा उत्तम अाणि हे एेतिहासिक व्हावे, असा अामचा पहिल्यापासूनच प्रयत्न राहणार अाहे.

पण भव्य- दिव्य संमेलनासाठी खर्चही माेठा येईल?
पाटील : खर्चाचे काय? संमेलन म्हटलं म्हणजे खर्च हा हाेताेच. ताे अापल्या साहित्याचा साेहळा असताे, सारस्वतांचा साेहळा असताे. भव्यदिव्यता म्हणजे काय तर येणाऱ्या प्रत्येकाच्या उत्तम व्यवस्थेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यावरच अापला प्राधान्याने भर असेल. सर्व मराठी साहित्यिक संमेलनाला कसे येतील यासाठी प्रयत्न, उत्तम कार्यक्रम, त्यासाठी येणारे मान्यवर, लाेकसंस्कृती दाखवणारे विविध कार्यक्रम यासाठी तर खर्च हाेताेच. पण मुख्य म्हणजे मराठी साहित्याच्या,

मराठी भाषेच्या प्रचार अाणि प्रसारासाठी काय करता येईल, त्यात अायाेजक म्हणून अापण वेगळे काय करू शकू, याचाही विचार सुरू अाहे. अापली संस्था माेठी अाहे. शिवाय संमेलनांना अनुदानही मिळते. त्यामुळे पैसा, खर्च यापेक्षा संमेलन उत्तम, उत्कृष्ट कसे हाेईल, यासाठीच अाम्ही सगळे प्रयत्न करणार अाहाेत.

संमेलनाचे वेगळेपण काय?
पाटील : हा साहित्य पूजेचा उत्सव अाहे. त्यामुळे त्यात मुख्य म्हणजे भाषेचा, साहित्याचा प्रचार अाणि प्रसार महत्त्वाचा अाहे. त्यात वेगळे काय करता येईल, हे अायाेजन समितीतील सर्वजण एकत्रपणे ठरवणार अाहेत. मुख्य म्हणजे मावळते संमेलन घुमान येथे झाले अाणि नियाेजित विश्व संमेलन अंदमान येथे हाेत असल्याने अनेकांना या संमेलनांना उपस्थित राहता अाले नाही. अाता पिंपरी-चिंचवड हे तसे बघितले तर मध्यवर्ती ठिकाण अाहे. त्यामुळे येथे येणारे साहित्य रसिक, साहित्यिक यांची संख्याही माेठी असेल. येणारा प्रत्येक जर समाधानी असेल, असाच हा साेहळा अाम्ही अायाेजित करणार अाहाेत.