आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे स्फोटात अमोनियम नायट्रेट, वॅक्सचा वापर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुणे शहरात एक ऑगस्ट रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात बॉल बेअरिंग, डिटोनेटर, 9व्होल्ट बॅटरी सेल, टायमर याच्यासोबतच अमोनियम नायट्रेट व वॅक्सचा वापर करण्यात आल्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवालात सिद्ध झाले आहे, पण याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी पुणे न्यायवैद्यक प्रयोगशाळेची टीम मुंबई येथील न्यायवैद्यक तज्ज्ञांकडे मंगळवारी गेली असल्याची माहिती पोलिस खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद विरोधी पथकाचे(एटीएस) प्रमुख राकेश मारिया यांच्याकडे पुणे गुन्हे शाखेकडील तपास हस्तांतरित करण्यात आला आहे. मारिया यांनी या स्फोटासंदर्भात तपास अधिकारी म्हणून मुंबई येथील एटीएस अधिकारी समद शेख यांची नेमणूक केली आहे. पुणे एटीएसचे पोलिस उपमहानिरीक्षक संजय लाटकर यांच्या देखरेखीखाली स्फोटाचा तपास करण्यासाठी 14 टीम बनवण्यात आल्या आहे. या टीमला विविध कामे वाटून दिली असून ते स्वतंत्ररीत्या आपले काम करत आहे. सदर स्फोट हा तीव्र क्षमतेचाच होता पण बॉम्बच्या सर्किटमधील चुकीच्या जोडणीमुळे तो अयशस्वी झाला. स्फोट झाला त्यावेळेस फक्त डिटोनेटर फुटल्याने आवाज झाला, पण अमोनियम नायट्रेटचा स्फोट होऊ शकला नाही. पोलिसांनी पाच दिवस स्फोटाचा तपास करत विविध शक्यतांची तपासणी केली असून त्यातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी समोर आल्या आहे. तपासात काही प्रमाणात निश्चित प्रगती झाली असून एटीएसचे अधिकारी यापुढील तपासाचे काम करणार आहे.
दयानंद पाटीलला रुग्णालयातून डिस्चार्ज - पुणे बॉम्बस्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याला ससून रुग्णालयातून उपचार पूर्ण झाल्यावर डिस्चार्ज देण्यात आला आहे. पाटील याच्या संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या आहेत.
‘सीसीटीव्ही’ प्रणालीमध्ये विलंब नाही - आर. आर पाटील