आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हल्ल्याचा कट रचण्यात मुरलीधरन पटाईत, एटीएसच्या चौकशीत माहिती उघड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - नक्षलवादी हल्ल्यांच्या रचना बनवण्यात के.मुरलीधरन पटाईत असल्याची धक्कादायक बाब दहशतवाद विराेधी पथकाच्या (एटीएस) तपासात समाेर आली आहे. नक्षलवादी नेता गणपती याच्या संपर्कात असलेला मुरलीधरन त्याच्याबाबत काेणतीही माहिती उघड करत नसल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिली.

केरळमध्ये विविध ठिकाणी माआेवादी कार्यकर्त्यांवर हाेणार्‍या हल्लयांना जाेरदार प्रतिहल्ला करुन प्रत्युत्तर द्या, असे मुरलीधरन याने काही र्इ-मेलच्या माध्यमातून सांगितले आहे. केरळ, आंध्र प्रदेश झारखंड आदी राज्यात नक्षलवादी हल्ले कशाप्रकारचे करायचे याबाबतची रचना बनवण्यात त्याचा माेठा वाटा आहे. नक्षलवादी नेता गणपती याच्या साथीने हल्ल्याच्या रचनांना मंजुरी देऊन पुढे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित दलमला त्याबाबत माहिती दिली जात हाेती. आणीबाणीच्या काळापासून भूमिगत झालेला मुरलीधरन हा विविध ठिकाणी वेगवेगळया नावाने राहिला असल्याने, त्याची खरी आेळख पटविण्यासाठी एटीएसने त्याची डीएनए चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे.

घरातून ५४ हजार जप्त : मुरलीधरन याला एटीएसने तळेगाव दाभाडे येथील लाेटस व्हिला या इमारतीतून ताब्यात घेतले. या वेळी त्याच्या राहत्या घरातून ५४ हजार ५५० रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्याचसाेबत सीपीयू, लॅपटाॅप, हार्डडिस्क, प्रिंटर, माॅनिटर, माआेवादी व नक्षलवादी विचारसरणीचे िलखाण साहित्य, सात माेबार्इल फाेन, पाच सिमकार्ड, दाेन डाेंगल, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, बनावट रेल्वे पास व व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. काेणताही कामधंदा न करताही ताे येथे राहत असताना त्यास दैनंदिन खर्चासाठी पैसे घेऊन येणार्‍या व्यक्तीचा पाेलिस शाेध घेत आहेत.

मुरलीधरनची अनेक पुस्तके प्रकाशित
मुरलीधरन भूमिगत झाल्यापासून त्याने माआेवादी विचारसरणीवर आधारित अनेक पुस्तकांचे लिखाण केले आहे. मल्याळम भाषेत ‘भूमिजाती बंधन’, अ‍ॅग्ररेरियन क्राइसिस, अ‍ॅग्ररेरियन अँड लँड दलित इश्यू, दलित वूमन इश्यू स्टडीज ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. ‘अगेन्स्ट अवॅकेनेझम’ हे त्याचे शेवटचे लिखित पुस्तक असून त्यात आंतरराष्ट्रीय माआेवादी चळवळीचा इतिहास आहे. तसेच माआेवादी विचारसरणीवर आधारित ‘पीप्लस मार्च’ हे आॅनलाइन मासिक ताे चालवत हाेता.

धुळ्याचा संजय राव एटीएसच्या रडारवर
धुळे जिल्ह्यातील माआेवादी कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य संजय दीपक राव (सध्या रा.अंबरनाथ, जि.ठाणे) हा महाराष्ट्राचा राहिवासी असल्याने त्याला सर्व ठिकाणाची माहिती हाेती. ताेच आराेपींना व इतर माआेवादी संघटनेचे सदस्यांना आश्रय देऊन त्यांची राहण्याची व्यवस्था करत असल्याचे एटीएसने न्यायालयात सांगितले. संजय राव याची माहिती घेऊन त्याला अटक करणे आवश्यक आहे. मात्र ताे सापडत नसल्याने एटीएस त्याला फरार घाेषित करण्याच्या तयारीत आहे.
बातम्या आणखी आहेत...