आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: गोल्डमॅन दत्ता फुगेंच्या जावयावर गोळीबार, थोडक्यात बचावला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र- जखमी शिवा बो-हाडे - Divya Marathi
छायाचित्र- जखमी शिवा बो-हाडे
पुणे- भोसरीतील गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा जावई शिवाजी गोविंद बो-हाडे (वय 27) याच्यावर रविवारी रात्री आठच्या सुमारास मोशीजवळ गोळीबार झाला. त्यात तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाच्या दंडाला गोळी चाटून गेल्याने या हल्ल्यातून बचावला आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
भोसरी एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर जय गणेश साम्राज्य चौकातून मोशीकडे चालला असताना शिवा रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबला होता. त्यावेळी दबा धरून त्याचा पाठलाग करणा-या दुचाकीस्वरांनी शिवावर गोळीबार केला. पल्सरवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी प्रथम त्याला लाकडी काठीने मारहाण केली व नंतर त्याच्यावर गोळीबार केला. मात्र, मारहाण केल्याने शिवा जमिनीवर विव्हळत उलथा-पालथा होत होता. त्यामुळे हल्लेखोरांचा त्यावेळी नेमका नेम चुकला व गोळीबारात गोळी शिवाच्या दंडाला चाटून गेली. दरम्यान, शिवाला लाकडी काठीने मारहाण केल्याने त्याचा हात मोडला आहे. सध्या त्याच्यावर चिंचवडमधील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
शिवा हा गोल्डमॅन दत्ता फुगे यांचा जावई आहे. शिवावर भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यातून कोर्टाने त्याची नुकतीच निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर भोसरी पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई कारवाई देखील केली होती. त्या खुनाच्या पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
याचबरोबर दत्ता फुगे चालवत असलेल्या फायनान्स कंपनीचा शिवा संचालक आहे. दत्ता फुगे यांच्यावर दोन दिवसापूर्वी लाखो रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याचाही या घटनेशी काही संबंध आहे याचा तपास पोलिस करणार आहेत. भोसरी एमआयडीसी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...