आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील कोथरूडमध्ये जिम मालकांवर गोळीबार, पाहा VIDEO

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळी झाडताना हल्लेखोर... - Divya Marathi
गोळी झाडताना हल्लेखोर...
पुणे- कोथरुडमधील सिटी प्राईड या सिनेमागृहाजवळच असलेल्या गोल्ड्स जिमच्या मालकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी संध्याकाळी घडली. बिगबझार मॉलच्या पार्किंगमध्ये मोटारसायकलवर उभ्या असलेल्या एका हल्लेखोराने कारच्या समोर येऊन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
शकील विजापुरे असे हल्ला झालेल्या जिम मालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापुरे यांच्या मालकीची गोल्ड्स जिम सिटी प्राईड सिनेमागृहाजवळ आहे. सोमवारी रात्री जिममधून निघाल्यानंतर ते बिगबझारच्या पार्किंगमध्ये गेले. त्यांच्या मोटारीमध्ये ते ड्रायव्हरच्या शेजारी बसले होते. पार्किंगमध्ये मोटारसायकलवर आलेल्या एका हल्लेखोराने त्यांच्या मोटारीच्या पुढील काचेवर एक गोळी झाडली. तर दुसरी गोळी ते ज्याठिकाणी बसले त्या बाजुच्या काचेवर झाडली. त्यानंतर आरोपी पसार झाला.
सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाहीत. या गोळीबारामुळे कोथरुडमध्ये एकच खळबळ उडाली. या हल्ल्यामागे अनैतिक संबंधाचे कारण असल्याचे समोर येत आहे. विजापुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अली नावाच्या व्यक्तीला चौकशीकरता ताब्यात घेतले आहे.
पुढे या घटनेचा थरारक व्हिडिओ पाहा...