आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Attack On Pune Cpm Party Office, Left Leaders Blame On RSS

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: पुण्यात CPMच्या ऑफिसवर हल्ला, संघाने हल्ला केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - केरळमधील कन्नूर जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकाची मार्क्सवादी कम्युनिस्ट कार्यकर्त्यांनी सोमवारी हत्या केल्याची प्रतिक्रिया मंगळवारी पुण्यात उमटली. नारायण पेठेतील कन्याशाळेजवळील सीपीआयच्या कार्यालयाची मंगळवारी दुपारी तीन वाजता पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांनी तोडफोड केली. कार्यालयावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

मंगळवारी दुपारी काही अज्ञात ते हल्लेखोर माक्सर्वादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयाजवळ दुचाकीवर आले. दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कार्यालयात त्या वेळी तीन कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी हल्लेखोरांना हटकले; परंतु हल्लेखोरांनी कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत लगेचच टेबलावरील काच, खुर्च्यांची मोडतोड करण्यास सुरुवात केली. सोबत आणलेले काळ्या रंगाचे आॅइलही हल्लेखोरांनी कार्यालयातील कागदपत्रांवर टाकले. "तुम्ही आरएसएस कार्यकर्त्याला मारले, त्यामुळे आम्ही इथे आलो,' असे एक हल्लेखोर या वेळी म्हणाला आिण त्यानंतर सर्वजण पसार झाले. माकप नेते अजित अभ्यंकर यांनी या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचा हात असल्याचा आरोप केला आहे. विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पंचनामा करत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक केले नसल्याची माहिती विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत यांनी सांगितले आहे.

हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गुंडांनीच हल्ला केला असून माकप या भ्याड हल्ल्याचा तीव्र िधक्कार करत असल्याचे पक्षाचे राज्य सचिव डाॅ. अशाेक ढवळे यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले अाहे. या हल्ल्यात घर कामगार असंघटित क्षेत्रातील कामगारांना युनियनमार्फत देण्यात येणाऱ्या ओळखपत्रांवर तेल केमिकल टाकून त्याची नासधूस करण्यात आली. हा हल्ला म्हणजे त्या कामगारांवर केलेला हल्ला असल्याचेही ते म्हणाले.
हल्ल्याशी संबंध नाही, बदनामीचे षड््यंत्र : रा. स्व. संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या हल्ल्याचा िनषेध केला अाहे. ‘पुण्यातील माकपच्या कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात कम्युनिस्ट पक्षाकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतले जात आहे. संघाचा कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर कधीच विश्वास नव्हता नाही. मात्र, अशी कोणतीही घटना घडली की संघाचे नाव घेऊन वारंवार बदनाम करण्याचे तंत्र यामागे आहे. समाजहिताची लक्षावधी सेवाकार्ये उभी करणाऱ्या संघाला बदनाम करून समाजाची दिशाभूल करण्याचे प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाहीत. काळाच्या कसोटीवर असे सर्व आरोप खोटे होते आणि संघाला बदनाम करण्यासाठीच झाले होते हे सिद्ध झालेले आहे. संघाचा लोकशाही प्रक्रियेवर वर पूर्ण विश्वास आहे या घटनेच्या अनुषंगाने कम्युनिस्ट पक्षानेदेखील असे हल्ले त्यांच्यावर का होतात याचाही सखोल विचार करणे गरजेचे आहे. या घटनेचा पाेिलसांनी तपास करून सत्य बाहेर अाणावे,’ अशी मागणी संघाचे कार्यवाह कैलास सोनटक्के यांनी केली.

छायाचित्र - अज्ञात हल्लेखोरांनी मंगळवारी पुण्यातील माकपच्या कार्यालयाची तोडफोड केली.