आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात आत्महत्येचा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्या दालनात एका आंदोलकाने बुधवारी दुपारी विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यश चव्हाण (रा. येरवडा, पुणे) असे या आंदोलकाचे नाव आहे. येरवडा येथील रस्त्यावर सतत अपघात होत असल्याने तो काही दिवसांपासून महापालिकेसमोर आंदोलनास बसला होता.

येरवडा येथील रस्त्यावर दुभाजक गतिरोधक बसवल्यामुळे सारखे अपघात होत असून याप्रकरणी येरवड्यातील काही नागरिकांनी पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. पुणे महापालिकेने अपघातावर तोडगा काढण्यासाठी दिलेले आश्वासन पाळल्याने आंदोलनकर्त्यांनी बुधवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांची भेट घेतली.
त्यावेळी अचानकपणे यश चव्हाण याने स्वत:सोबत आणलेले विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे बकोरिया यांच्या दालनात धावपळ उडाली. घटनेनंतर चव्हाण याला केइम रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, चव्हाणने विष प्राशन केले नव्हते, तर हर्बल प्रॉडक्ट प्राशन केल्याचे महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...