आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपातास नकार दिल्याने डॉक्टरवर हल्ला करणाऱ्या रिक्षाचालकास अटक; एक जण बालगुन्हेगार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्राणघातक हल्ला झालेले डॉ. अमोल बिडकर. - Divya Marathi
प्राणघातक हल्ला झालेले डॉ. अमोल बिडकर.
पुणे- अविवाहित युवतीच्या  पाच महिन्यांच्या  गर्भपाताला नकार देणाऱ्या  डॉक्टरवर कोयत्याचे  वार करण्याचा  प्रकार रविवारी येथे घडला. याप्रकरणी कोयत्याने वार करणाऱ्या प्रियकराला सांगवी पोलिसांनी अटक केली असून तो रिक्षाचालक आहे. सिद्धार्थ साजन सूर्यवंशी (वय 22 रा. महादेव आळी, खडकी बाजार) असे आरोपीेचे नाव आहे तर दुसरा बालगुन्हेगार आहे. डॉ. अमोल अशोक बीडकर (वय 37) यांनी याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद  दिली होती.
 
 डॉ. बीडकर यांचे पिंपळे गुरव भागातील काटेपुरम चौक येथे सखी हॉस्पिटल आहे. ते स्वत: स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. 15 दिवसांपूर्वी त्यांच्याकडे एक अविवाहित युवक-युवती आले. तेव्हा ती युवती 5 महिन्यांची  गर्भवती असल्याचे  लक्षात आले. तिचा गर्भपात करा, असे त्या युवकांचे म्हणणे होते. परंतु 12 आठवड्यांपेक्षा जास्त मोठ्या गर्भपातास कायद्याची परवानगी नसल्याने आणि त्या युवतीचा गर्भ 20 आठवड्यांपेक्षा मोठा असल्याने गर्भपात करता येणार नाही, असे डॉ. बीडकर यांनी स्पष्ट केले. पाच-सहा दिवसांनी या युवकांनी पुन्हा तीच मागणी केली. मात्र डॉक्टरांनी नकार दिल्यावर शनिवारी रात्री तिघांनी हॉस्पिटलमध्ये शिरून त्यांच्यावर  हल्ला केला. यात डाॅ. बीडकर जखमी झाले. बीृडकर यांच्या बोटांना किरकोळ दुखापत झाली आहे. खांद्यावर केलेला वार त्यांनी चुकवल्यामुळे ते थोडक्यात बचावले. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...