आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avinash Bhosale Car Collection And Luxurious Life

PHOTOS: किंग ऑफ BUILDERS जो क्रिकेट खेळण्यास हेलिकॉप्टरने जातो मैदानात!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- उद्योगपती अविनाश भोसले आपल्या पत्नीसमवेत)
पुणे- पुणे शहरातील जानेमाने बिल्डर, उद्योगपती अविनाश भोसले यांना सक्तवसुली संचानलायाने ( ईडी)ने नुकताच फेमा कायद्यांतर्गत 1 कोटी 83 लाखांचा दंड केला आहे. भोसले यांच्यावर 2007 साली विदेशात परकीय चलन व महागड्या वस्तू कस्टम ड्यूटी न भरता चोरून आणल्याचा आरोप होता.
अविनाश भोसले हे 2007 साली अमेरिका व दुबईचा दौरा करून आले होते. त्यावेळी त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि वस्तू आढळून आल्या होत्या. त्यावेळी कस्टम अधिका-यांनी त्यांना अटक केली होती. याप्रकरणी त्यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला होता.
लक्झरी कारचे आहे कलेक्शन-
रियल इस्टेट किंग म्हणून ओळखल्या जाणा-या भोसलेंकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्याजवळ मर्सिडीज बेन्झ, ऑडी, लेमोजिनपासून बीएमडब्ल्यू, स्कोडा यासारख्या एकास एक भारी गाड्या आहेत.
बाणेरमध्ये अलिशान पॅलेस-
अविनाश भोसले यांचे घर म्हणजे एक महालच आहे. बाणेरमध्ये दोन-अडीच एकरात परसलेल्या बंगल्यावर हेलिकॉप्टरपासून चॉटर्ड विमानेही उतरवली जातात. काही दिवसापूर्वी भारतात आलेली हॉलिवूडची जोडी ब्रॅड पीट व अन्जोलिना जोली हे जोडपं पुण्यातील ली-मेरिडियन या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलात न उतरता भोसले यांच्या घरी उतरली होते.
क्रिकेट खेळण्यासाठी जातात हेलिकॉप्टरने-
अविनाश भोसले दर रविवारी आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर हेलिकॉप्टरने जातात. आपल्या बाणेरमधील घरापासून 20 किलोमीटर दूर असलेल्या सिंहगड रोडवरील सिंहगड महाविद्यालयाच्या प्रांगणातील मैदानात ते हेलिकॉप्टरने खेळायला जातात. मैदानात त्यांना सोडल्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा घराकडे उड्डाण भरते. भोसले आपल्या मित्रांसमवेत 4-5 तास क्रिकेट खेळतात. त्यांच्यासमवेत मौज-मस्ती करतात. त्यानंतर फोन केला की मैदानात पुन्हा हेलिकॉप्टर न्यायला हजर होते. त्यांच्याकडे तीन खासगी हेलिकॉप्टर आहेत. यात बेल 407, बेल 427 आणि ऑगस्टा 109 अशी तीन प्रकारची हेलिकॉप्टर आहेत.
विश्वजित-स्वप्नालीच्या लग्नाला पोहचली होती बडी हस्तियां...
अविनाश भोसले यांची एकुलती एक मुलगी स्वप्नाली हिचा विवाह माजी मंत्री व काँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव विश्वजित यांच्याशी झाला आहे. 2012 साली झालेल्या शाही विवाह सोहळ्यात अनेक बड्या हस्ती सामील झाल्या होत्या. सर्वपक्षीय नेत्यांसोबत बॉलिवूडमधील मंडळीने लग्नाला हजेरी लावली होती.
पुढे पाहा किंग ऑफ बिल्डर नावाने प्रसिद्ध असलेल्या या उद्योगपतींची लक्झरी लाईफचे PHOTOS....