आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अविनाश भाेसलंेचा ‘अाप’ प्रवक्त्यांवर चारशे काेटींचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - यशवंत घाडगेनगर हाउसिंग काे-अाॅप. साेसायटीबाबत बदनामी करणाऱ्या बातम्या माध्यमांना दिल्याचा अाराेप करत बांधकाम व्यावसायिक अविनाश भाेसले यांनी राजेश बजाज, अाप पक्षाच्या प्रवक्त्या प्रीती मेनन शर्मा, दीदार अली पैगंबर, बी.एस.मुजफ्फर यांच्याविराेधात ४०० काेटींचा भरपाईचा दावा पुणे येथील िदवाणी न्यायालयात दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादींना समन्स बजावले असल्याची माहिती अॅड. प्रवीण कुलकर्णी यांनी िदली.
प्रीती मेनन यांनी काही िदवसांपूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेतली हाेती. शासकीय अधिकाऱ्यांसाठी अारक्षित असलेल्या जागेपैकी दीड एकर जागा भाेसले यांनी घेतली अाहे. त्यासाठी नियमानुसार परवानगी घेतली नाही की अनामतही भरलेली नाही. अॅड. राजेश बजाज यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये हा प्रकार उघडकीस अाणल्याचे मेनन यांचे म्हणणे हाेते. त्यानंतर पुण्याच्या िजल्हाधिकाऱ्यांनी जागेचा नजराणा व दंड भरण्याबाबतचे अादेश िदले. मात्र भाेसलेंनी तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून त्यावर स्थगिती अाणली. त्यामुळे भाेसलेंचे ५० काेटी रुपये वाचले व सरकारचा काेट्यवधींचा महसूल बुडाला, असा अाराेपही मेनन यांनी केला हाेता. त्यानंतर भोसले यांच्या वकिलांनी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...