आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ba Bapu Award Declare To Dr. Raghunath Mashalkar, Saini

डॉ. रघुनाथ माशेलकर, सैनी यांना बा-बापू पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या बा, बापू पुरस्कारांसाठी कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्टच्या विश्वस्त सुरेंद्र सैनी (इंदूर) व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.


विधायक कार्यकर्ता पुरस्कारांसाठी मीनल टिपणीस आणि अरुण खोरे यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी 25 हजार रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. दोन ऑक्टोबरला पुण्यात पुरस्कार वितरण होणार आहे.