आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दुपारी खोदला बोअरवेल, सायंकाळी पडला चिमुकला, पहाटे काढले सुखरुप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा. - Divya Marathi
व्‍हीडिओ पाहण्‍यासाठी फोटोमध्‍ये क्लिक करा.
बारामती (पुणे) - अठरा महिन्यांचा सोहम यादव हा मुलगा शेतात खेळता- खेळता 18 फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यामध्ये पडल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पुरंदर तालुक्यातील माळशिरस -नायगाव रस्त्यावरील लोळेवस्ती येथे घडली. आज (गुरुवार) पहाटे या मुलाला सुखरुप बाहेर काढण्‍यात यश आले. ही मोहीम सात तास चालली. त्‍याच्‍यावर सुरुवातीला सासवडला प्राथमिक उपचार करून त्‍याला पुण्‍यातील केईएम रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले. तो प्रचंड घाबरलेला असून, प्रकृती उत्‍तम असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले.

लोळेवस्ती येथील राहुल साहेबराव यादव या शेतकऱ्याने आपल्या घराजवळ असलेल्‍या शेतात कालच (बुधवारी) सुमारे ३०० फूट खोल बोअरवेल खोदले होते. मात्र, त्याला पाणी लागले नाही. त्यामुळे राहुल यांनी या बोअरवेलवर रिकामे पोते झाकण म्हणून ठेवले होते. राहुल यांच्या पत्नी त्यावर ठेवण्यासाठी दगड आणायला गेल्या, तेवढ्यात सायंकाळी पाच वाजताच्‍या सुमारास या दांपत्याचा मुलगा सोहमचा खेळता- खेळता पोत्यावर पाय पडला व तो बोअरवेलमध्ये पडला. सुदैवाने तो २० फूट खोलीवरच अडकून बसला. या घटनेची माहिती कळताच घाबरलेल्या यादव दांपत्याने गावकऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, यश न आल्यामुळे अखेर प्रशासनाला माहिती देण्यात आली.
रात्रभर युद्धपातळीवर प्रयत्न
पुरंदरचे तहसीलदार संजय पाटील यांनी सांगितले की, ‘अग्निशामक दलाचे एक पथक गावात दाखल झाले होते. रोहन ज्या खड्ड्यात पडला होता, त्याच्या शेजारीच समांतर असा २० ते २२ फूट खोल खड्डा जेसीबी, पोकलेनच्या साह्याने खोदण्यात आला. राष्ट्रीय आपत्ती राखीव दलाच्या (एनडीआरएफ) पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा ते घटनास्थळी दाखल झालेत. खड्ड्यात सोडलेल्या कॅमेऱ्याच्या आधारे सोहमची हालचाल दिसत होती. तसेच या बोअरवेलमध्ये ऑक्सिजन सोडण्यात आला होता. गुरुवारी पहाटे त्‍याला सुखरुप बाहेर काढण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...