आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी उपाशी; जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे समोर आले आहे. शासकीय मेसमधील जेवणाचा दर्जा खालावत चालल्याने विद्यार्थ्यानी जेवण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शासनाकडे वारंवार तक्रार करून देखील अद्याप या विद्यार्थांच्या मेसच्या प्रश्नाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
 
तक्रार करुनही स्थिती जैसे थे
मोशी येथे 750 विद्यार्थांसाठीचे हे शासकीय वसतिगृह आहे. या वसतिगृहात पिंपरी चिंचवड शहरामध्ये विविध महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी राहत आहेत. मात्र त्यांच्या मेसमधील जेवणाचा दर्जा उत्तम नसल्याने 70 विद्यार्थांनी समाजकल्याण आयुक्त यांना 13 तारखेला तक्रार दिली. अद्यापही त्यांच्या तक्रारींची प्रशासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यानी वसतिगृहामधील ही मेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मेस बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण 
विद्यार्थांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 दिवसापासून मेसमध्ये  अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. याबाबत मागील महिनाभरापासून आम्ही शासकीय पातळीवर 3 वेळा लेखी तक्रारी देऊनही समाधान झालेले नाही. वसतिगृहाचे रेक्टर वाघमारे सरांनी सलग तीन वेळा समाजकल्याण आयुक्त पुणे, प्रादेशिक आयुक्त पुणे, समाजकल्याण अधिकारी डोंगरे यांना कळवले असतानाही त्यावर महिन्यापासून कसल्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. त्यामुळे 70 मुलांनी 13 तारखेला समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे निवेदन 
दिले होते, त्यांनी आश्वासन देऊनही मेस आणखी चालू झाली नाही, गेल्या दोन दिवसापासून मेस बंद असल्यामुळे मुले उपाशी आहेत. लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती विद्यार्थ्यानी केली आहे. 
 
प्रश्न मार्गी कधी लागणार
जेवणाचा दर्जा निकृष्ट, वसतीगृहात अस्वच्छता अशीच काहीशी परिस्थिती शासकीय वसतीगृहांची झालेली दिसून येत असल्याने प्रशासन यावर काय कारवाई करणार आणि विद्यार्थ्यांच्या जेवणाचा प्रश्न मार्गी कधी लागेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. 
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि व्हिडिओ
 
बातम्या आणखी आहेत...