आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajaj Auto Comapany News In Marathi, Chakan, Divya Marathi

चाकणच्या बजाज कर्मचा-यांना दरमहा 10 हजारांची पगारवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चाकणस्थित ( पुणे) बजाज ऑटो कंपनीच्या व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटनांत अनेक महिन्यांपासून सुरू असलेला तिढा अखेर मिटला आहे. नव्या करारानुसार व्यवस्थापनाने कर्मचा-यांना प्रतिमहिना 10 हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ देण्याचे मान्य केले आहे.
नवीन करार पूर्वलक्षी प्रभावाने 1 एप्रिल 2013 पासून तीन वर्षांपर्यंत लागू राहणार आहे. याबाबत कंपनीच्या अधिका-याने सांगितले की, वाटाघाटी सुरू झाल्यापासून दिलेला प्रस्ताव चाकण युनियनने मान्य केल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. व्यवस्थापन आणि चाकण प्रकल्पातील कर्मचा-यांच्या ‘विश्वकल्याण कामगार संघटने’त गेल्या आठवड्यात करारावर एकमत झाले होते. यानुसार, व्यवस्थापन आणि कर्मचारी संघटना एकमेकांवरील खटले 15 दिवसांत परत घेणार आहेत.

अशी वेतनवाढ
पाच व अधिक वर्षांपासून कार्यरत कायम कर्मचा-यांना दरमहा 10 हजारांची, तर तीनपेक्षा अधिक वर्षांपासूनच्या कर्मचा-यांना 9,500 रुपये वेतनवाढ मिळेल.

60 टक्के बेसिक पे
सुधारित वेतनाचा 60 टक्के हिस्सा ‘बेसिक पे’चा भाग तर उर्वरित रक्कम अलाउन्सेसमध्ये मिळेल.

इसॉपचा उल्लेख नाही
कर्मचा-यांची दुसरी मोठी मागणी मोफत ‘इसॉप’चा (शेअर्सची भागीदारी) नव्या करारात उल्लेख नाही. बजाजचे एमडी राजीव बजाज यांनी इसॉपला विरोध केला होता.

उपस्थिती बोनस
पूर्ण हजेरीचे वार्षिक 12 हजार रुपयांचे बक्षीस दरमहा 1000 रुपये करण्यासही होकार.

इतकी वेतनवाढ
10,280 रुपये किमान
11,520 रुपये कमाल

असा आहे चाकण प्रकल्प
2000 वर कर्मचारी
900 कायमस्वरूपी
12 लाख दुचाकी गाड्यांचे वर्षाकाठी उत्पादन होते.
पल्सर, अ‍ॅव्हेंजर, निन्जा, केटीएम आदी.