आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात ‘बजाज’च्या इमारतीला आग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आकुर्डी येथील बजाज ऑटो कंपनीतील रिसर्च अँड डेव्हलपमेंट (आर अँड डी) विभागातील एका नवीन इमारतीला गुरुवारी सकाळी मोठी आग लागली. जीवितहानी झाली नसली तरी कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. शॉर्टसर्किटमुळे दुर्घटनेचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

कंपनीचे सरव्यवस्थापक किरण दाणी म्हणाले, बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एअर कंडिशन लावण्याचे काम सुरू होते. त्यामुळे कर्मचारी तेथे नव्हते. सकाळी आग लागली त्याआधी मजूरही बाहेर पडले होते. कंपनी, पिंपरी-चिंचवड मनपा व टाटा मोटर्स कंपनीच्या सहा बंबांनी ४५ मिनिटांत आग आटोक्यात आणली.