आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदु राजासाठी या मुस्लिम राणीने त्‍यागला होता प्राण, वाचा रंजक LOVE STORY

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मराठा इतिहासातील सर्वात रंजक प्रेमकथा म्‍हणून बाजीराव मस्तानीचा उल्‍लेख केला जातो.  एवढेच नाही तर हिंदु-मुस्लिम ऐक्‍याचे प्रतिक म्‍हणून ही प्रेमकथा आजही प्रेरणा ठरते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी 5 ते 23 ऑक्टोबर पर्यटन पर्वाची घोषणा केली आहे. पर्यटकांसाठी ऐतिहासिक किल्ल्यांवर राहाण्याची सुविधा भारतीय पुरातत्व विभागाकडून करण्यात येणार आहे. त्‍या अनुषंगाने आम्‍ही आपल्याला बाजीराव-मस्‍तानीबाबत रंजक माहिती देणार आहोत.

बाजीरावसाठी मस्तानीने घेतला विषाचा घोट
पेशवा बाजीराव यांची मस्‍तानी ही दुसरी पत्‍नी होती. ती बुंदेलखंडचे राजा छत्रसालचे मुलगी होती. छत्रसाल यांची पारसी-मुस्लिम पत्नी रुहानीबाई ही मस्तानी हिची आई होती. 1740 मध्‍ये गंभीर आजाराने बाजीरावांचे निधन झाले.हे दु:ख मस्‍तानीला पचवता आले नाही. त्‍यामुळे विष घेऊन तिनेही आपले जीवन संपवले. मुस्‍लीम पद्धतीने तिच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात आले.

राज्‍यासोबत दिली होती मुलगी
मुगल सुबेदार मोहम्मद खान बंगश(मुगल शासक) हा आपल्‍या विराट फौजेला घेऊन वर्ष 1728 बुंदेलखंडवर हल्‍ला करण्‍याच्‍या तयारीत होता. पण, आपण त्‍याचा सामना करू शकत नाही, हे छत्रसालच्‍या लक्षात आले. त्‍यामुळे त्‍याने बाजीराव यांना एक पत्र लिहून मदत मागितली. पत्र मिळताच बाजीराव हे आपल्‍या सैन्‍यांसह त्‍यांच्‍या मदतीला आले. दोन्‍ही सैन्‍यांनी मिळून मोहम्मद शाह बंगश याचा पराभव केला. त्‍यात बंगश याला मराठा फौजांनी ताब्‍यात घेतले आणि पुन्‍हा कधी बुंदेलखंडवर हल्‍ला करणार नाही, या करारावर सोडून दिले. दरम्‍यान, बाजीराव यांनी केलेल्‍या या मदतीमुळे छत्रसाल यांनी त्‍यांना आपला तिसरा मुलगा मानले. एवढेच नाही तर आपल्‍या राज्‍याचे तीन तुकडे करून एक बाजीराव याला दिला. यामध्‍ये झांसी, कालपी, सिरोंज, सागर आणि हिरदेनगर या परिसराचा सहभाग होता. तसेच राजा छत्रसाल यांनी आपली मुलगी मस्तानी हिचे बाजीराव यांच्‍यासोबत लग्‍नही लावून दिले. पण, काही इतिहासकारांच्‍या म्‍हणण्‍यानुसार मस्‍तानी ही बाजीराव यांच्‍या दरबारातील 'राजनर्तकी' होती..

पहिल्‍याच भेटीत देऊन बसले काळीज
मस्‍तानी ही खूप सुंदर होती. तिला पाहताच बाजीराव हे आपले काळीज देऊन बसले. ती घोडदौड, धनुष्‍यबाण आणि तलवारबाजीत निपून होती. लग्‍नानंतर तिला बाजीरावांकडून एक मुलगाही झाला. त्‍याचे नाव शमशेर बहादूर (पेशवा) होते. मुस्‍लीम संस्‍कारात त्‍याची वाढ झाली. पण, पानीपतच्‍या लढाईमध्‍ये त्‍याला वीरमरण आले.

शाही महल बनवला
बाजीराव यांनी मस्‍तानीसाठी पुणे येथील कोथरुडमध्‍ये शाही महल बनवला होता. लग्‍नानंतर मस्‍तानी ही पुण्‍यातील शनिवारवाड्यात राहत होती. पण, बाजीरावच्‍या पहिल्‍या राणीकडून तिचा छळ होत असल्‍याने बाजीरावांनी तिच्‍यासाठी महल बांधला. या महलामध्‍ये बाजीरावांनी अनेक‍ आरशे लावले होते ते आजही कायम आहेत. आता हा महल राजा दिनकर केळकर संग्रालयाच्‍या नावाने ओळखला जातो. मस्‍तानीच्‍या वस्‍तू आजही येथे ठेवलेल्‍या आहेत.

मस्‍तानी विषयी आणखी रंजक गोष्‍टी वाचण्‍यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...