आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजीरावच्या चितेवर सती गेली होती मस्तानी, अशी संपली होती प्रेमकहाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशवा बाजीराव यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव मस्तानी होती. ती मुस्लिम धर्माची होती. ती अतिशय देखणी होती. तिला सौंदर्य सम्राज्ञी म्हटले जायचे. बुंदेडखंडचा महाराजा छत्रसाल यांची ती कन्या होती. त्यांची पारशी-मुस्लिम पत्नी रुहानी बाई मस्तानीची आई होती. 28 एप्रिल 1740 रोजी मराठा साम्राज्याचे पेशवे बाजीराव यांचे नर्मदा नदीच्या काठावर रावेर येथे आजाराने निधन झाले. त्यांची प्रेयसी-पत्नी मस्तानी चितेवर सती गेली असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळतो. पण तिच्या मृत्यूबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले जातात.
संजय लिला भन्साळी यांच्या बाजीराव-मस्तानी या चित्रपटावरुन सध्या बरेच वाद सुरु झाले आहेत. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात सिनेमागृहात येणार असल्याचे समजते. या पार्श्वभूमिवर मस्तानीच्या आयुष्याचा घेतलेला वेध.
डिसेंबर 1728 मध्ये मोगल सुभेदार महंमदखान बंगष याने बुंदडखंडावर स्वारी केली. बंगष याच्या हल्ल्यापुढे आपला टिकाव लागणार नाही याची कल्पना महाराजा छत्रसाल यांना होती. यावेळी छत्रसाल म्हातारेही झाले होते. त्यांनी बाजीरावांना भावपूर्ण पत्र लिहिले. त्यानंतर बाजीराव लगेच बुंदेडखंडला गेले. छत्रसाल यांचे लष्कर बाजीरावांच्या मराठा लष्कराला येऊन मिळाले. दोघांच्या संयुक्त फौजांनी बंगषच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला. यात त्याचा पराभव झाला. यावेळी त्याचा मुलगा कायमखान हाही मोठी फौज घेऊन बापाच्या मदतीसाठी आला होता. त्याचाही पराभव मराठा-बुंदेली सैन्याने केला. बंगष याने बुंदेलखंडवर कधीही स्वारी न करण्याचा शब्द दिला. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.
लगेच मिळालेल्या मदतीने छत्रसाल बाजीरावांचे आभारी झाले. त्यांनी त्यांना तिसरा मानवपुत्र मानले. आपल्या राज्याचे तीन तुकडे करुन त्यातील एक भाग बाजीरावांना दिला. यात झाशी, काल्पी, सिरोंज, सागर आणि हिरदेनगर यांचा समावेश होता. यासह मस्तानी नावाची कन्या बाजीरावांच्या सुपूर्द केली. ती राजनर्तकी होती असा काही ठिकाणी उल्लेख आढळतो.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, दोघांमध्ये कसे बहरले प्रेम... मस्तानी कशी गेली सती...