आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले नसतील टिळकांचे हे फोटो, गजानन महाराजांनी प्रसादात दिली होती भाकरी...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- स्वातंत्र्यलढ्याचे आद्य प्रवर्तक, भारतीय असंतोषाचे जनक, गणितज्ञ, खगोलतज्ज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते, लोकमान्य अशा उपाधीने ज्‍यांचा उल्‍लेख केला जातो ते बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्‍यतिथी. त्‍यानिमीत्‍त्‍ा divyamarathi.comआपल्‍याला टिळकांबाबत काही खास बाबी सांगत आहे.
 

उतारवयात टिळकांना मधुमेहाच्या आजाराचा त्रास सोसवत होता. तरीसुद्धा ते विश्रांती घेत नसत. औषधोपचार चालू होते. पण त्यांचा हवा तसा उपयोग होत नव्हता. डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. पण मनातील विविध विचारांच्या वावटळीमुळे तो कृतीत येत नव्हता. जुलै 1920 मध्‍ये त्‍यांना हिवतापाने घेरले. आता मात्र त्‍यांना अंथरुणावर पडून राहण्याशिवाय उपाय नव्हता. त्यावेळी ते मुंबईला सरदारगृहात रहात होते. पुढे त्‍यांना वाताचे झटकेची येऊ लागले. चाहत्यांची अस्वस्थताही वाढली. सर्वाची मनःस्थिति चिंतातूर झाली होती. 1 ऑगस्ट 1920 ला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोकमान्यांची इहलोकची यात्रा संपली. भारताचा तेजस्वी सूर्य मावळला गेला.
 
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, टिळकांविषयीच्‍या या खास बाबी, पाहा दुर्मिळ फोटो.
बातम्या आणखी आहेत...