बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील माइल स्टोनच. दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक होते. परंतु, तारुण्यात असताना या दोघांनी एकत्र येत आंतराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू केले होते. शनिवार, 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस आहे. त्या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार या मासिकाबद्दल रंजक माहिती...
कधी सुरू केले होते मासिक, काय होते नाव ?
> बाळासाहेब ठाकरे आपल्या उमेदीच्या काळात 'फ्री प्रेस जर्नल' मध्ये व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.
> 1960 मध्ये त्यांनी ही नोकरी सोडली.
> त्यानंतर त्यांनी कधी नोकरी केली नाही.
> त्याच काळात शरद पवार, भा. कृ. देसाई आणि शशिशेखर वैद्यक या तीन तरुणांना सोबत घेत त्यांनी एक आंतराष्ट्रीय दर्जाचे मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला.
> अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या ‘टाइम’ मासिकाच्या तोडीचा त्याचा दर्जा असावा, असे या सगळ्यांचे एकमत झाले.
> चौघांनीही खूप विचार करून याचे नियोजन केले.
> 'राजनीती' असे मासिकाचे नाव ठरले
> त्यावर चौघांची मालकी समान राहील, हे निश्चित करण्यात आले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, मार्केटिंग, डिझाइन, संपादकीय मजकूर यावर घेतली मेहनत.... बाळासाहेबांच्या हट्टापायी पाहिला मुहूर्त ... बाळासाहेबांच्या अंतर्ज्ञानी भगिनीने काय वर्तवले होते भाकित... मासिकाचे नंतर काय झाले...
संदर्भ - लोक माझे सांगाती (शरद पवार यांची राजकीय आत्मकथा)