पुणे- जैन पर्यूषण पर्वाच्या काळात राज्यात मांसविक्री बंदीवरुन निर्माण झालेल्या वादावरून राजकारण तापले आहे. मुंबई अनेक ठिकाणी मांस विक्री बंदीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला शिवसेनेसह मनसेने कडाडून विरोध केला आहे. परंतु, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासंदर्भात एक खुलासा समोर आला आहे.
बाळासाहेबांना नॉनव्हेज अत्यंत प्रिय होते. मात्र, जैन धर्माच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी चक्क नॉनव्हेज खाणे सोडून दिले होते, असा खुलासा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अगस्ती कानिटकर यांनी एका मुलाखतीत केला होता. कानिटकर हे व बाळासाहेबांचे मित्र आहेत. त्यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर एका मुलाखतीत एक किस्सा सांगितला होता.
बाळासाहेबांनी अचानक सोडले नॉनव्हेजकानिटकर यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्याच्या राजकारणात सक्रीय होण्याआधी बाळासाहेब हे पत्नी मीना ठाकरे यांच्यासोबत नेहमी पुण्याला येत असत. मुकुंद नगरातील समर्थ अपार्टमेंटच्या पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये ते राहात असत. बाळासाहेबांना नॉनव्हेज अत्यंत प्रिय होते. परंतु, मुंबईत जैन धर्माच्या एका कार्यक्रमात ते सहभागी झाले आणि त्यानंतर त्यांनी अचानक नॉनव्हेज खाणे सोडून दिले. शाकाहार घेण्याचा त्यांनी निर्धार घेतला आणि तो शेवटपर्यंत पाळला.
खवैय्ये होते बाळासाहेबबाळासाहेब ठाकरे हे खवैय्ये होते. मात्र, नॉनव्हेज खाणे सोडल्याचे खुद्द बाळासाहेबांनी 'दैनिक भास्कर'चे कन्सल्टिंग एडिटर मार्क मॅन्युअल यांनी घेतलेल्या मुलाखतीत कबूल केले होते.
1950 च्या दशकात बाळासाहेब फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्टूनिस्ट म्हणून काम करत होते. तेव्हा त्यांना महाराष्ट्रीय जेवण व चर्चगेटच्या ओल्ड गॉर्डन रेस्तरॉमधील 'इटालियन पास्ता' खूप पसंत होते. त्यांना थाई फूडची आवड होती. ते नेहमी मुंबईतील लोकप्रिय रेस्तरांमधूनच जेवण मागवत असत. त्यांची पत्नी मीना ठाकरे या देखील स्वयंपाकात सुगरण होत्या. त्यांना देखील चाइनीज खूप पसंत होते.
पुढील स्लाइड्सवर वाचा, बाळासाहेबांना अशी लागली होती धूम्रपानाची सवय...