आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय गृहमंत्री शिंदेंच्या जावयाचा जमीन वाद उफळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे जावई राज हेमंत श्रॉफ (रा.मुंबई) यांच्या बालेवाडी येथील 51 गुंठे जागेचा वाद पुन्हा उफळला आहे. श्रॉफ यांचे सदर जागेचे देखभालीचे काम करणार्‍या पंकज प्रकाश काळे (वय 33) यांनी जागेचे मूळ मालक गणेश नानासाहेब गायकवाड यांच्यासह इतर नऊ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याची तक्रार दिली असून या सर्वांवर चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बालेवाडी येथील सदर जमिनीच्या मालकी हक्कावरून श्रॉफ व गायकवाड यांच्यात वाद सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पंकज काळे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, जमिनीचे मूळ मालक गणेश गायकवाड याने बेकायदेशीर जमाव जमवून नमूद जागेत लावलेले बोर्ड काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आपल्या दुचाकीने मला धडक देऊन हात फ्रॅक्चर केला, तसेच जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. या तक्रारीवरून चतुर्शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांवर कोर्टाचे ताशेरे
बनावट कागदपत्रांच्या आधारे बालेवाडी येथील सदर 51 गुंठे जमीन लाटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी राज श्रॉफ यांच्या विरोधात पुन्हा खटला चालविण्याचे आदेश न्यायालयाने दिल आहे. राज हेमंत र्शॉफ हे संसद सदस्यांचे नातेवाईक असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा ठपका यापूर्वी न्यायालयाने पोलिसांवर ठेवलेला आहे.