आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्‍यात कुंटणखान्यातून बांग्लादेशी मुलींची सुटका

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - बांग्लादेशातील सात मुलींना फसवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणा-या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली असून मुलींची सुटका करण्यात आली आहे. यात सहा अल्पवयीन मुली आहेत. त्यापैकी दोन मुली बांग्लादेशातील अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातील आहेत. त्यांच्या सुटकेसाठी बांग्लादेश सरकारने भारताला विशेष विनंती केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर पिटा लावण्यात आला आहे. पिंकी दास आणि अनिता थापा अशी अटक करण्यात आलेल्या अंटींची नावे आहेत. गेल्या काही वर्षापासून पुण्यात वेश्याव्यवसाची प्रकरणे उजेडात येत असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.